कानावरील तिळावरून समजतं तुमच्या आयुष्याचं रहस्य… ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
कानांवरील तिळांचे स्थान तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरेच काही सांगते. कानाच्या वरच्या बाजूला तीळ असलेले लोक रागीट असतात, तर मधल्या बाजूला तीळ असलेले लोक इमानदार असतात. सामुद्रीक शास्त्रानुसार, कानांवरील तिलांच्या आधारे व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्याचे अंदाज लावता येतात.

सामुद्रिक शास्त्र हे सर्व शास्त्रांपेक्षा वेगळं आहे. या शास्त्राद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावरील खूणा पाहून ती व्यक्ती कशा स्वभावाची आहे, त्याचा व्यवहार आणि वागणूक कशी आहे आणि त्याचं भवितव्य काय असू शकतं हे सांगता येतं. यात नाक, कान, डोळे आणि गळ्याची ठेवण पाहून त्याचा स्वभाव सांगितला जातो. ज्या लोकांच्या कानावर तीळ असतो, ती व्यक्ती अत्यंत खास असते. भाग्यशाली असते असं सांगितलं जातं. आज आपण कानावरील कोणत्या भागावर तीळ असण्याचा अर्थ का असतो हे समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत.
कानाच्या वरच्या भागवरील तिळाचा अर्थ…
ज्या लोकांच्या कानाच्या वरच्या भागावर तीळ असतो, असे लोक प्रचंड रागीट असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून हे लोक त्रागा करत असतात. तसेच हे लोक नखरेबाज असल्याचंही सांगितलं जातं. आपल्यापेक्षा कोणीच अधिक बुद्धीमान नाही, असं या लोकांना वाटत असतं. सांगायची गोष्ट म्हणजे हे लोक खरोखच समजूतदारही असतात.
कानाच्यामध्ये तीळ…
ज्या लोकांच्या कानाच्या मध्ये तीळ असतो ते लोक प्रचंड इमानदार असतात. आदर्शांवर चालणारे हे लोक असतात. मैत्री तोडणे त्यांना अजिबात आवडत नाही. प्रत्येक समाजाला आदर्शांवर चाललं पाहिजे, असा संदेश देण्याचं काम हे लोक करत असतात. या लोकांना कुणाचीही गुलामी करायला आवडत नाही.
कानाच्या खाली तीळ…
कानाच्या खाली तीळ असणारे लोक भावूक असतात. अशा लोकांना ऑफिसमध्ये बॉसने त्यांच्या चुकांमुळे फटकारले तरी हे लोक रडायला लागतात. हे लोक प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. या लोकांना प्रेमसंबंधात धोका मिळतो, असं सांगितलं जातं. आपल्या भावूक स्वभावामुळे त्यांना प्रेमात धोका मिळतो.
कानाच्या मागे तीळ…
ज्या लोकांच्या कानाच्या मागच्या भागावर तीळ असतो, असे लोक कल्पनाशील असतात. ते स्वाभिमानी असतात. कल्पनेच्या बळावर जगावर विजय मिळवला जाऊ शकतो असं या लोकांना वाटत असतं. हे लोक समाजात प्रिय असतात. असं असलं तरी या लोकांच्या मनात रिक्तता येते. यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या स्वभावात दृढ निश्चयीपणा असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
