डोळे फडफडणे देतात अनेक संकेत; काय असतात त्यांचे चांगले आणि वाईट परिणाम
बऱ्याचदा डोळे फडफडणे हे एक तर शुभ लक्षण मानलं जातं तर काहेवळा अशुभ मानलं जातं. बरं यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार याचे नियम हे महिला आणि पुरुषांसाठी वेगळे असतात. महिला आणि पुरुषांचा कोणता डोळा शुभ असतो आणि कोणता अशुभ पाहुयात.

साधारणपणे डोळे फडकणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु जेव्हा जेव्हा कोणाचे डोळे फडफडले की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात की काही शुभ किंवा अशुभ घटना घडणार आहे. समुद्रशास्त्रात असे म्हटले आहे की शरीराच्या अवयवांव्यतिरिक्त डोळे फडकणे हे शुभ किवा अशुभ लक्षणे असू शकतात.समुद्रशास्त्र सांगते की शुभ किंवा अशुभ संकेत तुमच्या कोणता डोळा फडफ़डत आहे यावरही अवलंबून असतं. तेही पुरुषांच्याबाबतीत आणि महिल्यांच्याबाबतीत वेगळे संकेत मिळतात असंही म्हटलं जातं.
महिलांसाठी कोणता डोळा फडफडणे शुभ आणि अशुभ?
असे मानले जाते की डाव्या आणि उजव्या डोळ्याच्या फडफडण्याचे महत्त्व वेगवेगळे असते. महिलांसाठी डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर उजव्या डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. महिलांमध्ये उजवा डोळा फडफडणे हे देखील आजाराचे लक्षण मानले जाते.
पुरुषांचा कोणता डोळा फडफडणे शुभ आणि अशुभ?
दुसरीकडे, पुरुषांसाठी त्याचे काही वेगळे संकेत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे शुभ मानले जाते जसं की ते त्यांच्या प्रिय व्यक्तीला भेटणार आहेत. तसेच त्यांनी कोणती जुनी इच्छा पूर्ण होणार आहे.पण पुरुषांसाठी डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. ते एक दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. असे मानले जाते की पुरुषांचा डावा डोळा फडफडणे हे कोणत्या तरी येणाऱ्या समस्येचे संकेत आहेत.
विज्ञान काय म्हणते?
जर आपण विज्ञानाबद्दल बोललो तर त्याच्या मते, कोणत्याही व्यक्तीचा उजवा डोळा फडफडणे ही एक आवेगपूर्ण क्रिया आहे आणि ती कोणत्याही मानवाच्या नियंत्रणाबाहेरची आहे. जर डोळे सतत फडफडत असतील तर ते कोणत्याही ज्योतिषीय घटनेचे लक्षण नाही तर ते एखाद्या आरोग्य समस्येशी संबंधित असू शकते. यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.
वैज्ञानिकतदृष्ट्या डोळा फडफडण्याची कारणे काय असू शकतात?
असे मानले जाते की जेव्हा डोळ्यांवर खूप ताण असतो किंवा तुमची झोप पूर्ण होत नाही किंवा तुमच्या मनात तणाव असतो किंवा तुमचा स्क्रीन टाइम जास्त असतो तेव्हा त्यामुळे तुमचे डोळ्यांचा वेगाने उघडझाप होते. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. हे तुमचे डोळे फडफडण्याचे कारण बनते आणि तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
