Falgun Amavasya 2025: फेब्रुवारीमध्ये फाल्गुनी अमावस्या कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या…
Phalgun Amavasya Muhurat: सनातन धर्मामध्ये, फाल्गुन महिन्यात येणारी अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी होळीच्या आधी फाल्गुन अमावस्या साजरी केला जातो. आमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान, ध्यान आणि दान केले जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने व्यक्तीला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढते.

दर महिन्याला आमावस्या असते. आमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभकार्य करू नये असे सांगितले जाते. आमावस्येच्या दिवशी विष्णू भगवान आणि तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते. त्यासोबतच आमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावानी पिंडदान आणि तर्पन केले जाते.
आमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्यामुळे तुमच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होते आणि देवाच्या कृपेनी तुमच्या पूर्वजांच्या आत्मेला आनंद आणि शांती मिळते. आमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यामुळे आणि ध्यान केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. अशा परिस्थितीमध्ये चला जाणून घेऊया फाल्गुन आमावस्येची तारीख, शुभ वेळ आणि पूजेची योग्य पद्धत.
वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तारीख 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 वाजता सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.14 वाजता संपेल. अशा परिस्थितीत फाल्गुन अमावस्या 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी काही विशेष गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते आणि तुमचे सर्व महत्त्वाची काम पूर्ण होतात.
फाल्गुनी अमावस्येचा शुभ काळ ब्रह्म मुहूर्त – सकाळी 5.09 ते 5.57 पर्यंत संधिप्रकाश वेळ – संध्याकाळी 6.07 ते 6.42 पर्यंत निशिता मुहूर्त – 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 12.08 ते 12.57 पर्यंत अभिजीत मुहूर्त – दुपारी 12.11 ते 12.57 पर्यंत सूर्योदय – सकाळी 6.47 वाजता सूर्यास्त – संध्याकाळी 6.20 वाजता
फाल्गुन अमावस्या पूजा पद्धत : फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. यानंतर, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. या काळात, तुमच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करा. देवघरात दिवा लावा आणि भगवान विष्णूची पूजा करा. विष्णू भगवानला फळे आणि मिठाई अर्पण करा. त्यानंत भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा. यानंतर, जीवनात सुख आणि शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात किंवा गरिबांना अन्न, पैसे आणि कपडे दान करा. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी दान केल्याने माणसाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे .
