AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : घरात आल्यानंतर थकवा जाणवतो? मन अस्वस्थ होतं? मग फॉलो करा फेंग शुईच्या या सोप्या टीप्स

आपल्याला कामावरून घरी आल्यानंतर अनेकदा थकल्यासारखं वाटतं, मन अस्वस्थ होतं तसेच आपली सारखी चिडचिड देखील होते. यावर फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : घरात आल्यानंतर थकवा जाणवतो? मन अस्वस्थ होतं? मग फॉलो करा फेंग शुईच्या या सोप्या टीप्स
Feng ShuImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:32 PM
Share

आपण जेव्हा कामावरून घरी येतो, तेव्हा अनेकदा आपल्याला घरात प्रसन्न वाटत नाही. मन अस्वस्थ होतं, तसेच आपण सारखी चिडचिड करतो. आपल्या या वर्तनाचा आपल्या घरातील इतर सदस्यांवर देखील मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे आपलं घर अशांत होतं. घरात सतत काही मोठं कारण नसताना देखील भांडण होतात. ज्या घरात नेहमी भांडणं होतात, त्या घरात कधीही पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्र आणि फेंग शुईमध्ये देखील सांगण्यात आलं आहे. मग तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की घरात येताच तुम्हाला अचानक अस्वस्थ का वाटू लागतं? तुमची चिडचिड का होते? तर त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा हे एक कारण असू शकतं. फेग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

या वस्तू घराबाहेर फेकून द्या – जर तुम्हालाही तुमच्या घरात प्रसन्न वाटत नसेल, तुमचं मन अस्वस्थ असेल तर अशा गोष्टी घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे घडतात. जेव्हा तुमच्या घरात खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक्स वस्तू तशाच पडू असतात, किंवा बंद पडलेली घड्याळं असतात, तेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे या वस्तू एक तर दुरुस्त करून आणा किंवा या वस्तू घरातून बाहेर काढा, ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत हेईल असं फेगं शुईमध्ये म्हटलं आहे.

घरात खिडक्यांना पडदे लावा – फेंग शुई शास्त्रानुसार जर तुमच्या खिडक्यांना पडदे नसतील तर आजच पडदे लावू घ्या, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहातं. घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर घर शांत राहतं, घरात सुख समृद्धी येते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

झाडं – अशी काही झाडं असतात जी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात, अशी झाडं घरात आवश्य लावली पाहिजेत असा सल्ला देखील फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?