Chandra Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार?, वाचा सविस्तर…

या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, बहुतेक उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. भारतात या चंद्रग्रहणाची दृश्यमानता शून्य असल्याने हे सूर्य ग्रहण पाहता येणार नाही.

Chandra Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार?, वाचा सविस्तर...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 07, 2022 | 12:00 PM

मुंबई : 2022 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 दिवशी होणार आहे.या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) असेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे भारतीयांना हे चंद्रग्रहण पाहता येणार नाही. या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 ला सकाळी 8:59 ते 10.23 पर्यंत होईल. या संपूर्ण वर्षात एकूण 2 चंद्रग्रहण होतील आणि ती दोन्हीही संपूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan) असतील.

या वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, बहुतेक उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. भारतात या चंद्रग्रहणाची दृश्यमानता शून्य असल्याने हे सूर्य ग्रहण पाहता येणार नाही.

2022 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे देखील संपूर्ण चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना उजवीकडे सरकते आणि त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या समोर येतो. अशा स्थितीत पृथ्वी सूर्याला पूर्णपणे झाकते, त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही, यावेळी संपूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते.

30 एप्रिलला या वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12:15 पासून सुरू झाले होते. हे सूर्यग्रहण 1 मे रोजी पहाटे 4: 7 मिनिटांनी संपले. ग्रहणाचा कालावधी सुमारे 4 तासांचा होता. नासाच्या म्हणण्यानुसार, 30 एप्रिलच्या ग्रहण दरम्यान सूर्याची 64 टक्के प्रतिमा चंद्राद्वारे अवरोधित केली गेली.अंटार्क्टिकाशिवाय हे सूर्यग्रहण अटलांटिक प्रदेश, पॅसिफिक महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागात दिसले.हे ग्रहण भारतात दिसले नव्हते. तसेच या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें