AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा लोकांच्या घरी चुकूनही करू नये भोजन, जीवनात येते नकारात्मकता

धर्मग्रंथात भोजनाचे नियम दिलेले आहेत. यामध्ये स्वयंपाक करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. यासोबतच धर्मानुसार कोणता आहार योग्य आणि कोणता अयोग्य हेही सांगण्यात आले आहे.

अशा लोकांच्या घरी चुकूनही करू नये भोजन, जीवनात येते नकारात्मकता
या लोकांच्या घरी करू नये जेवणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 30, 2023 | 12:11 PM
Share

मुंबई : आपल्या घरी कोणालातरी जेवणासाठी आमंत्रित करणे किंवा घरी पाहुण्यांचे स्वागत करणे हा हिंदू धर्म आणि भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण धर्मग्रंथात भोजनाचे नियम दिलेले आहेत. यामध्ये स्वयंपाक करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. यासोबतच धर्मानुसार कोणता आहार योग्य आणि कोणता अयोग्य हेही सांगण्यात आले आहे. पुराणांमध्ये महापुराणाचा दर्जा असलेल्या गरुड पुराणात (Garud Puran) काही ठिकाणी भोजन निषिद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार काही लोकांच्या घरात अन्न खाल्ल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. अशा ठिकाणी जेवल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, व्यक्तीचे पतन होते.

या ठिकाणी कधीही खाऊ नका

गरुड पुराणानुसार काही लोकांच्या घरी अन्न कधीही घेऊ नये. कारण अन्नामध्ये ऊर्जा असते आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि मनावर पडतो. यामुळे नकारात्मक विचाराने बनवलेले अन्न खाऊ नये. तसेच नकारात्मक वातावरणात बसून जेवू नये. कोणाच्या ठिकाणी खाणे निषिद्ध मानले जाते यावर एक नजर टाकूया.

  1. क्रोधी व्यक्ती :  जी व्यक्ती तापट स्वभावाची असते तिच्या घरचे अन्न कधीही खाऊ नका. त्यांच्या स्वभावामुळे वातावरणात नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचा परिणाम तुमच्यासोबतच अन्नावरही होतो. अशा व्यक्तीची संगत टाळणे चांगले.
  2. चोरी किंवा फसवणूक करणार्‍याच्या घरी : चोर किंवा गुन्हेगाराच्या घरी कधीही जेवू नका. चुकीच्या मार्गाने पैसे कमावलेल्या व्यक्तीच्या घरचे अन्न खाल्ल्याने त्यांच्या पापांचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो. असे अन्न तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करू शकते. तुम्हाला गरीब करू शकतो.
  3. किन्नरांच्या घरी : हिंदू धर्मात तृतीय पंथीयांना दान देणे अत्यंत शुभ मानले जाते. पण त्यांना त्यांच्या घरचे अन्न ग्रहण करू नये.
  4. संसर्ग पसरवणारी ठिकाणे : जिथे घाण आहे किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे अशा ठिकाणी अन्न कधीही खाऊ नये. जसे-हॉस्पिटल, गंभीर रुग्णाच्या आसपासची जागा इ.
  5. अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित लोक : जे लोकं अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांच्या घरी कधीही काहीही खाऊ नये. असे लोकं दुसऱ्याच्या कुटुंबाला अडचणीत टाकून पैसे कमावतात. अशा लोकांच्या घरचे पाणी प्यायल्यानेही आपण पापाचे भागीदार होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक