स्वयंपाक करताना आणि जेवताना ‘या’ चुका करु नका!

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत. (Avoid These Mistakes While Eating)

स्वयंपाक करताना आणि जेवताना 'या' चुका करु नका!
food
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 1:15 PM

मुंबई : देवी लक्ष्मीची पुजा केल्याने घरात सुख, संपत्ती, आनंद, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे नवस करतात. व्रत-वैतल्य करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वंयपाक घरातून किंवा जेवण बनवण्याच्या पद्धतीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

हिंदू धर्मात अन्नाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रातही अन्नाचा अनादर करणे पाप मानले जाते. यासाठी घरातील वडीलधारी किंवा ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणतात की कधीही अन्नाचा अपमान होऊ देऊ नका. विविध धर्मात जेवण बनवण्याची पद्धत त्याचे नियम हे वेगवेगळे असतात. त्यानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत.

रात्री खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक

अनेकांना मध्यरात्री झोपतेवेळी काही ना काही खाण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. बिघडलेल्या आरोग्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमजोर होते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी कोणत्याही गोष्टींचे सेवन करु नये.

रात्री हे पदार्थ खाणे टाळा

रात्रीच्या वेळी दूध पिणे हे फायदेशीर मानले जाते. मात्र दही खाणे हे तितकंच नुकसानकारक…कारण दही हे थंड असते. त्यामुळे तुम्हाला सर्दी- खोकला होऊ शकतो. त्यासोबतच रात्री जेवणात बटाटा, भात, जवस खाणे टाळावे. या प्रकारचे अन्न खाल्ल्याने घरात पैशाची समस्या उद्भवते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

दिशेची विशेष काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीवर सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीचा प्रभाव पडतो. त्यामध्ये दिशेचे योग हा विशेष मानला जातो. त्यामुळे नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेला तोंड करुन जेवण करावे. याशिवाय शूज आणि चप्पल घालून जेवण करु नये. तसेच स्वयंपाकघर ही जेवण करण्याची उत्तम जागा मानली जाते. यामुळे राहू ग्रह शांत होतो. तसेच आर्थिक स्थितीही चांगली राहते.

आंघोळ झाल्यावर जेवण बनवा

अनेक जण अंघोळ झाल्यावर अन्न शिजवतात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. यामुळे घरातील महिलांनी सकाळी अंघोळ करुन देवाची पूजा करुन स्वयंपाक करावा. तसेच चपातीचा तुकडा गाय, कुत्रे आणि कावळ्याला काढून ठेवा. यानंतर अग्निदेवताला भोग चढवल्यानंतर कुटुंबियांना जेवण द्या.

तुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका

कधीही तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका. तसेच पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली बसून जेवण करणे टाळा. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच कधीही अन्न टाकू नका. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आले ‘सुपरफूड’, वाचा याबद्दल अधिक !

Boost your Immune System : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे?, तर ‘या’ फळांचं सेवन करा…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.