Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘ही’ व्रतकथा नक्की वाचा, दूर होतील सर्व समस्या!
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या दिवशी 'ही' व्रतकथा नक्की वाचल्या सर्व समस्या दूर होतील अशी मान्यता..., सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे... अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे.
Ganesh Chaturthi 2024: हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला फार महत्त्व आहे. आजपासून पुढचे 10 दिवस सर्वत्र भक्तीमय वातावरण असणार आहे. कोणतंही विघ्न दूर करणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा असं मानलं जातं. गणरायाची मनोभावे भक्ती केल्यानंतर फळ देखील गोड मिळतं. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन काम सुरू केल्याने प्रत्येक कामात यश मिळते. श्रीगणेशाला ज्ञान आणि बुद्धीची देवता मानले जाते. या दिवशी त्याची पूजा केल्याने बुद्धी वाढते. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाकडे सुख-समृद्धी मागितली जाते. गणेश चतुर्थीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामुळे हा सण अधिक महत्त्वाचा ठरतो.
गणेश चतुर्थी व्रत कथा
गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचं झालं तर, एकदा शंकर आणि माता पार्वकी नर्मदा नदी किरनारी बसले होते. तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितलं. शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले, पण या खेळातील विजय-पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंढ्या गोळा केल्या, त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले – बेटा, आम्ही चौपट खेळत आहोत, पण विजय-पराजय कोणाचं झालं याचं निर्णय सांगणारं कोणी नाही त्यामुळे तू सांग कोण विजयी झालं आणि कोण अपयशी..
अशात शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरु होतो. तीन वेळा खेळ खेळला जातो… योगायोगाने तीन वेळा माता पार्वती यांची विजय होतो. खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय-पराजयाचा निर्णय सांगतो. माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकर यांना विजयी घोषित करतो.
यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहाण्याचा शाप देतात. बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की, हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे. मी हे कोणत्याही द्वेषातून केले नाही. मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की, नागकन्या इथे गणेशपूजा करण्यासाठी येतील, त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर, असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल.’ असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या.
अखेर एक वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या. त्यानंतर नागकन्यांकडू गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने 21 दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले. मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवं आहे… असं विचारलं.
यावर मुलगा म्हणाला, ‘हे विनायक! मला इतकी शक्ती द्या की मी माझ्या पायांनी चालत माझ्या आई-वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल…’ गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली. यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली. खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या.
रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार 21 दिवस श्री गणेशाचे व्रत केलं. अखेर माता पर्वती यांचा राग शांत झाला… असं ही कथा आहे. अशा अनेक कथा आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून सांगितल्या जात आहेत.