नवजात बालकांनाही मृत्यूनंतर पूर्वज मानायचं का? गरूड पुराण काय सांगते? जाणून घ्या
नवजात शिशुच्या मृत्यूनंतर श्राद्धविधी केले जात नाही. धार्मिक ग्रंथात त्याबाबत स्पष्ट केलं आहे. पण त्यांची गणना पितरात होते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्याचं उत्तर गरूड पुराणात दिलं आहे. नेमकं काय आणि कसं ते समजून घ्या

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू असून हा पंधरवडा पितरांसाठी गणला जातो. हिंदू धर्मानुसार घरोघरी पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी पूजाविधी केले जातात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं. असं केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते, असं शास्त्र सांगतं. पण नवजात बाळ किंवा लहान मुलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांची गणना पितरांमध्ये होते का? ते पितरांच्या श्रेणीत बसतात का? त्यांच्यासाठी श्राद्ध घालणं आवश्यक आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाहीत. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर त्याचं उत्तर गरुड पुराणात दिलं आहे. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की नवजात बालकाच्या मृत्यूनंतर श्राद्ध केले जात नाही. कारण ते पितृच्या श्रेणीत येत नाही. गरुड पुराणात याला “बाल-गति” म्हटले असून अशा आत्म्यांचा लवकरच पुनर्जन्म होतो, अशी मान्यता आहे.
पितरं या शब्दाचा अर्थ वडीलधारी व्यक्ती किंवा मृत आत्म्यासाठी नाही. शास्त्रानुसार, जी व्यक्ती गृहस्थ जीवन जगली आहे. लग्न केलं आहे. मुलं जन्माला घातली आहेत. कुटुंब पुढे नेलं आहे अशा पूर्वजांना मृत्यूनंतर पितृलोकात स्थान मिळते. त्यामुळे असे मृतात्मे तर्पण किंवा श्राद्ध केल्याने समाधानी होता. त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी हा पंधरवडा पाळला जातो. गरूड पुराणानुसार, अविवाहित व्यक्ती किंवा ज्यांना मुले नाहीत त्यांना पितृलोकात कायमचे स्थान मिळत नाही. तर मृत लहान मुलं किंवा नवजात बालकांच्या आत्म्याला बाल गती संबोधलं जातं. म्हणजेच त्यांचा लवकर जन्म होतो. त्यामुळे पितृलोकात गेल्यावर पूर्वज होत नाहीत.
नवजात बाळाच्या आत्म्याचा कोणत्याही वंशाशी काहीही संबंध नसतो. म्हणून त्यांना लवकर पुनर्जन्म मिळातो म्हणून त्यांच्या फक्त साधे विधी किंवा देवाचे स्मरण पुरेसे आहे. कुटुंबातील सदस्यांना फक्त नित्य विधी आणि सुतक शुद्धी करावी लागते. त्यांच्यासाठी श्राद्ध, पिंडदान किंवा पितृ तर्पण यांचा कोणताही नियम नाही. ज्यांनी लग्न केले आणि घरगुती जीवन जगले आणि वंश पुढे नेला तेच पूर्वजांच्या श्रेणीत येतात. म्हणून, नवजात किंवा मुलासाठी श्राद्धाची कोणतीही तरतूद नाही. ते पूर्वजांच्या श्रेणीत समाविष्ट नाही, म्हणून त्याला पितृपक्षाच्या विधींची आवश्यकता नाही.
