AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात, घटस्थापना मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या!

गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठीची नवरात्री असते. यामध्ये भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा केली जाते.

Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात, घटस्थापना मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या!
Gupt Navratri 2021
| Updated on: Feb 12, 2021 | 9:28 AM
Share

मुंबई : दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री (Gupt Navratri 2021) असते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री वर्षात दोन वेळा येते. पहिली माघच्या महिन्यात येते आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. माघ महिन्याची गुप्त नवरात्री आज 12 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो (Gupt Navratri 2021).

गुप्त नवरात्रीचं महत्त्व काय?

साधारणपणे गृहस्थ कुटुंबातील लोक गुप्त नवरात्रीचे व्रत ठेवू शकत नाही. ते चैत्र आणि शारदीय नवरात्री मध्ये देवीची उपासना करु शकतात. गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठीची नवरात्री असते. यामध्ये भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा केली जाते. तांत्रिक विशेष रुपाने या नवरात्रीमध्ये साधना करतात. गुप्त नवरात्रीदरम्यान करण्यात येणारी पूजा, मंत्र, पाठ आणि प्रसाद सर्व काही रहस्य ठेवलं जातं. तरच ही साधना यशस्वी होते. साधनेदरम्यान देवी भगवतीचे भक्त कडक नियमांचं पालन करतात.

या दहा महाविद्यांची पूजा केली जाते

माता कालिका

तारा देवी

त्रिपुर सुंदरी

भुवनेश्वरी

माता चित्रमस्ता

त्रिपुर भैरवी

माता धूम्रवती

माता बगलामुखी

मातंगी

कमला देवी

शुभ मुहूर्त

कलश स्थापनेची शुभ वेळ : सकाळी 8 वाजून 34 मिनिटं ते 9 वाजून 59 मिनिटांपर्यंत

अभिजीत मुहूर्त : दुपारी 12 वाजून 13 मिनिट ते 12 वाजून 58 मिनिटांपर्यंत

गुप्त नवरात्रीला अशी करा पूजा

पूजेसाठी सर्वात आधी कलश स्थापन करावं लागतं. यामध्ये देवी दुर्गेचं पूजन विना कुठल्याही विघ्नाशिवाय कुशलतेने संपन्न होऊ शकेल. देवी दुर्गेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करुन लाल रंगांचं कुंकू आणि सोनेरी गोटे असलेली ओढणी अर्पित करा. पूजा स्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेच्या जमीनीवर सात प्रकारचे धान्य, पवित्र नदीची वाळू आणि जव टाका. कलशात गंगाजल, लवंग, वेलची, पान, सुपारी, रोली, मौली, अक्षत, हळद, शिक्का आणि फुल टाका (Gupt Navratri 2021).

आंब्याचे पानं कलशावर सजवून ठेवा, वरुन जव किंवा तांदूळ वाटीत भरुन कलशाच्या वर ठेवा. त्यामध्ये नवीन लाल कपड्यात बांधून पाणी असलेलं नारळ डोक्याला लावून नमस्कार करा आणि कलश वाळूवर स्थापन करा. त्यानंतर नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावा. सोबतच देवीच्या विशेष मंत्र, पाठ याचं गुप्त रुपाने पठन करा. जास्तकरुन अघोरी आणि तांत्रिक गुप्त नवरात्रीदरम्यान मध्यरात्री देवीची पूजा करतात.

Gupt Navratri 2021

संबंधित बातम्या :

स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप, वाचा भृंगीची कथा…

Special Story | ऐतिहासिक सोमनाथ मंदिर, 17 वेळा नष्ट होऊनही भारताचं वैभव

Special Story | हलाहल पचवणाऱ्या आदिअनंत ‘निळकंठ’ महादेवाच्या ‘तांडवा’ची चर्चा, वाचा याच्याविषयी…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.