‘या’ मंदिरात हिंदू आणि मुस्लिम प्रार्थनेसाठी येतात एकत्र, ‘त्या’ घटनेनंतर सुरु झाली प्रथा
भारतातील 'या' मंदिरात हिंदू आणि मुस्लिम एकत्र प्रार्थनेसाठी येतात... इतिहासकारांच्या मते हे मंदिर जवळपास 700 वर्ष जूनं आहे.... जाणून घ्या मंदिराबद्दलचा खास इतिहास

हिंदू धर्मात 33 कोटी देव आहे असं आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत आणि त्यामागे इतिहास देखील सांगण्यात आला आहे. भारतात संस्कृती, प्रचीन परंपरा, पूजा -पाठ याला फार महत्त्व आहे. तर संपूर्ण भारतात असे असंख्य मंदिर आहेत, ज्याचे भक्त मोठ्या श्रद्धने देवांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि प्रत्येक मंदिराचा इतिहास देखील आहे. तर आज अशा एका मंदिराबद्दल जाणून घेऊ, जिथे हिंदू आणि मुस्लिम एकत्र डोके टेकवतात.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे असलेले जिहरी माता मंदिर हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांचे श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही समुदायांचे लोक प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरात येतात.
इतिहासकारांच्या मते हे मंदिर जवळपास 700 वर्ष जूनं आहे. या मंदिराबद्दल एक लोकप्रिय आख्यायिका आहे. जेव्हा हा परिसर खारवार राजवंशाच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा येथे दोन मुस्लिम लग्नातील पाहुण्यांनी आपले प्राण गमावले. यामुळे व्यथित होऊन जिहरी मातेनेही आपले प्राण सोडले.
मान्यतेनुसार, तेथून लग्नाची वरात जात होती. तेव्हा वराती पाणी पिण्यासाठी थांबले. त्या नदीतील पाणी पियाचं नाही… असं गावकऱ्याचं म्हणणं होतं. पण वरातीत असेलेल्या दोम मुसलमान व्यक्तींना ते त्यांच्या धर्माविरोधात वाटलं आणि त्यांनी पाणी प्यायले.. त्यानंतर त्यांचा जागीत मृत्यू झाला.
लग्नाच्या वरातीत सामिल झालेल्या मुस्लीम वरात्यांनी असं केल्यामुळे जिहरी देवीला प्रचंड दुःख झालं. दोन मुस्लीम व्यक्तींचं निधन झाल्यामुळे देवीने देखील प्राण सोडले. जिहरी देवीने असं करताच संपूर्ण लग्नातील पाहुण्यांचं रुपांतर दगडात झालं… असं देखील सांगितलं जातं. त्यानंतर, त्याठिकाणी स्थानिक लोकांनी जिहरी मातेला समर्पित मंदिर स्थापन केले.
भक्तांच्या मते, हे ठिकाण खरोखरच चमत्कारिक आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केली तर देवी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते, मग तुमचा समुदाय कोणताही असो… अशी येथील मान्यती आहे… म्हणूनच आजही या मंदिराला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांच्या लोकांमध्ये विशेष मान्यता आहे. जिहरी माता मंदिर हे या वस्तुस्थितीचे जिवंत उदाहरण आहे की श्रद्धेला सीमा नसते. खरी भक्ती हृदयांना जोडते, त्यांना वेगळे करत नाही. आजही हिंदू आणि मुस्लिम या मंदिरात एकत्र डोके टेकवतात… असं म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)
