AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात कोणता राम हवा? अखेर निकष ठरला, ज्या मूर्तीच्या चेहऱ्यावर…

Ram Mandir Ayodhya 19 जानेवारी रोजी पवित्र अग्नि प्रज्वलित केला जाईल, त्यानंतर 'नवग्रह' आणि 'हवन' करण्यात येईल. 20 जानेवारी रोजी मंदिराचे गर्भगृह सरयूच्या पाण्याने धुतले जाईल, त्यानंतर वास्तुशांती आणि अन्नाधिवास विधी होईल. 21 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीला 125 कलशांनी अभिषेक करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना विश्रांती देण्यात येईल.

मंदिरात कोणता राम हवा? अखेर निकष ठरला, ज्या मूर्तीच्या चेहऱ्यावर...
रामलल्ला Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 30, 2023 | 10:36 AM
Share

मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. मंदिरात बसवलेल्या दरवाजापासून ते गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या मूर्तीपर्यंत सर्व सामान्यांना या सर्वच गोष्टींचे कुतूहल आहे. पुढील महिन्यात भव्य मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम लालाची मूर्ती बसवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मतदान होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राम मंदिराच्या उभारणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या ट्रस्टच्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या बैठकीत रामललाच्या मूर्तीबाबत मतदान होणार आहे.

अशा प्रकारे होणार मूर्तीची निवड

वेगवेगळ्या शिल्पकारांनी बनवलेल्या तीन मूर्तींचे डिझाईन्स टेबलवर ठेवण्यात येणार आहेत. 22 जानेवारीला मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सर्वाधिक मते मिळविणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी बुधवारी सांगितले होते की, वयाच्या पाचव्या वर्षी प्रभू रामाची कोमलता दर्शविणारी 51 इंच उंचीची मूर्ती तीन डिझाइनमधून निवडली जाईल.

चंपत राय म्हणाले, “ज्या मूर्तीमध्ये सर्वात जास्त दिव्यता असेल आणि 5 वर्षाच्या मुलाच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलेली आहे, लहान मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि निरागसपणा असेल तीच गर्भगृहात स्थापनेसाठी निवडली जाईल. दरम्यान, श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याचा आढावा घेतला.

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, हे काम घाईने केले जात नसून पुरेसा वेळ देऊन दर्जेदार पद्धतीने केले जात आहे. मंदिराच्या बांधकामाची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, दुसरा टप्पा जानेवारीमध्ये पूर्ण होईल, जेव्हा मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. तिसर्‍या टप्प्यात जटिल बांधकामाचा समावेश आहे.

अशाप्रकारे होणार रामललाचा अभिषेक

जन्मभूमी मार्गावर मुख्य प्रवेश द्वार आणि बसविण्यात येत असलेल्या सुरक्षा उपकरणांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नृपेंद्र मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना दिले. मंदिराच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, अभिषेक सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होईल आणि सात दिवस चालेल. 16 जानेवारी रोजी, मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेले यजमान श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र येथे समारंभ आयोजित करतील. सरयू नदीच्या तीरावर दशविध स्नान, विष्णूपूजा आणि गायींचा नैवेद्य होणार आहे.

17 जानेवारी रोजी भगवान राम यांच्या बालस्वरूपाची मूर्ती घेऊन निघालेली मिरवणूक अयोध्येत पोहोचेल. मंगल कलशातील सरयू नदीचे पाणी घेऊन भाविक रामजन्मभूमी मंदिरात पोहोचतील. 18 जानेवारी रोजी गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, ब्राह्मण वरण आणि वास्तुपूजनाने औपचारिक विधी सुरू होतील.

19 जानेवारी रोजी पवित्र अग्नि प्रज्वलित केला जाईल, त्यानंतर ‘नवग्रह’ आणि ‘हवन’ करण्यात येईल. 20 जानेवारी रोजी मंदिराचे गर्भगृह सरयूच्या पाण्याने धुतले जाईल, त्यानंतर वास्तुशांती आणि अन्नाधिवास विधी होईल. 21 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीला 125 कलशांनी अभिषेक करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना विश्रांती देण्यात येईल. 22 जानेवारी रोजी सकाळी पूजेनंतर मृगशिरा नक्षत्रात दुपारी रामलाला अभिषेक केला जाईल.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.