AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या वस्तू दारामागे ठेवताय? नकळत करताय मोठी चूक! शास्त्रानुसार, मोठं नुकसान होण्याची शक्यता

घरात आपण अशा काही अशा गोष्टी करतो, ज्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. वास्तूशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की. काही अशा गोष्टी आहेत, ज्या दारामागे ठेऊ नये.

या वस्तू दारामागे ठेवताय? नकळत करताय मोठी चूक! शास्त्रानुसार, मोठं नुकसान होण्याची शक्यता
| Updated on: May 13, 2026 | 4:17 PM
Share

घरात स्वच्छता असेल तरच, लक्ष्मी नांदते असं म्हणतात. पण घर स्वच्छ ठेवण्याचे देखील काही महत्त्वाचे नियम आहे. अनेक जण घरातील पसार दाराच्या मागे लपवतात, ही फार चुकीची गोष्ट आहे. सांगायचं झालं तर, वास्तुशास्त्रानुसार, घराचा दरवाजा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नसून, तो सकारात्मक ऊर्जेचा मुख्य प्रवेशद्वार आहे. दरवाजामागे अनावश्यक वस्तू ठेवल्याने घरातील चांगल्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो. ही छोटीशी चूक कुटुंबातील सदस्यांसाठी मोठे संकट ठरु शकते. त्यामुळे घराती सफाई करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. शिवाय दरवाजाच्या मागे कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत याची देखील काळजी घेतली पाहिजे, तर जाणून घ्या कोणत्या आहे त्या वस्तू, ज्या दरवाजाच्या मागे ठेवल्याने नुकसान होऊ शकतं. 

जागेच्या कमतरतेमुळे बरेच लोक दारामागे हुकांवर खूप कपडे टांगतात. वास्तूनुसार, कपड्यांच्या या ढिगाऱ्यात नकारात्मक ऊर्जा जमा होते. परिणामी, घरातील सदस्यांच्या मनात सतत एक प्रकारचा चिडचिड निर्माण होते. म्हणून दरवाजाच्या माागे कपडे लटकवून ठेऊ नका. शिवाय औषधांच्या पिशव्या दारामागे कधीही टांगू नयेत. शास्त्रानुसार, औषधे ही आजारपणाचे प्रतीक आहेत. औषधे दाराजवळ ठेवल्यास त्यांचे दुष्परिणाम घरातच राहतील आणि कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्च वाढेल.

जुने किंवा मागील वर्षाचे कॅलेंडर दारामागे ठेवणे हा प्रगतीच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे. ते तुमच्या आयुष्याची प्रगती थांबवते आणि काळाला मागे खेचते. म्हणून प्रगतीचे चक्र फिरते. नेहमी एक नवीन कॅलेंडरसाठी घरात योग्य ठिकाणी ठेवा. दारामागे घाणेरडे बूट किंवा चपला ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशी एक प्रचलित समजूत आहे की, यामुळे राहू ग्रहाची दृष्ट लागते. त्याच्या थेट परिणामामुळे जीवनात अनावश्यक अशांती, मानसिक अस्थिरता आणि कलह निर्माण होऊ शकतो.

बरेच लोक ओले टॉवेल किंवा कपडे दारात वाळत घालतात. वास्तूनुसार, ओल्या वस्तू दमटपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहेत. दारात किंवा दाराच्या पायरीवर ओले कपडे ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.  जर तुम्ही दारामागे एखादी जड बॅग किंवा जड वस्तू टांगली, तर दार पूर्णपणे उघडत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याला ‘अब्रोध दोष’ म्हणतात. या दोषामुळे करिअरमध्ये अडथळे येतात आणि व्यक्ती हळूहळू कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते.

घरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी, दाराचा आवाज म्हणजे सतत कर् कर् आवाज येत असेल आणि तो थांबवण्यासाठी दाराला त्वरित तेल लावा. दाराची मागची बाजू नेहमी स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवा. दारावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...