AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prediction 2026 : जग हादरणार, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ, सोन्या-चांदीचे भाव… 2026 मध्ये ग्रहांच्या दिशेमुळे काय होणार परिणाम ?

New Year 2026 Prediction : मंगळ हा 2025 चा राजा आहे, पण नवं वर्ष, म्हणजेच 2026 हे सुरू व्हायला फार वेळ नाहीये. तर, 2026 या नवीन वर्षाचा शासक आणि मंत्री कोणते ग्रह असतील ते जाणून घेऊया. आणि या ग्रहांच्या मंत्रिमंडळाचा जगावर काय परिणाम होऊ शकतो? हेही समजून घेऊया.

Prediction 2026 : जग हादरणार, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ, सोन्या-चांदीचे भाव... 2026 मध्ये ग्रहांच्या दिशेमुळे काय होणार परिणाम ?
2026 मध्ये ग्रहांच्या दिशेमुळे काय होणार परिणाम ?Image Credit source: Unsplash
| Updated on: Nov 29, 2025 | 3:19 PM
Share

New Year 2026 Prediction : 2025 हे वर्ष संपायला फार काळ उरलेला नाही, तर अवघ्या महिन्याभरानंतर 2026 हे वर्षही सुरू होईल. 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप खास मानले जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, 2026 मध्ये ग्रहांच्या मंत्रिमंडळातही बदल होईल. 2025 वर्षाचा अधिपती मंगळ आहे, जो ग्रहांचा सेनापती आहे, परंतु 2026 चा अधिपती गुरु असेल. 2026 मध्ये, ग्रहाच्या मंत्र्यांचे पद मंगळ ग्रहाकडे असेल. 2026 या वर्षासाठी ज्योतिषी भाकिते करत आहेत. तर, येत्या वर्षासाठी ही ग्रहमाला काय दर्शवते ते जाणून घेऊया. तसेच, नवीन वर्षात देश आणि जगावर त्याचा संभाव्य परिणाम काय होईल हेही समजून घेऊया.

भारत आणि जगावर कसा असेल प्रभाव ?

2026 मध्ये ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती सामान्य राहील. नवीन वर्षाचा स्वामी मंगळ असल्याने, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. देशात आणि जगात संघर्ष कायम राहू शकतात. भारतात राजकीय अशांतता दिसून येऊ शकते. बंडखोरीच्या घटना घडू शकतात. मंगळाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.

सायबर फसवणुकीच्या केसेसमध्ये होणार वाढ ?

एवढंच नाही तर लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होईल. या वर्षी सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. 2026 मध्ये संपत्ती मिळवणे सोपे होईल, परंतु ती टिकवणे कठीण असेल. 2026 हे वर्ष वडिलोपार्जित मालमत्ता, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात व्यापारी युद्ध होऊ शकते. परदेशात भारतीय व्यावसायिक व्यवहारांबाबत धोरणे आखली जातील. त्यामुळे ह वर्ष अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

नवीन वर्षात रोजगाराच्या संधी वाढतील. सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही आणखी मोठी वाढ होऊ शकते. गुरु ग्रहाच्या प्रबळ प्रभावामुळे धार्मिक कार्यक्रम वाढू शकतात. शिवाय, आर्थिक क्षेत्रात मंद पण स्थिर प्रगती दिसून येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.