AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या अंगणात ‘या’ 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय

वास्तूशास्त्रानुसार घराच्या अंगणाला ब्रह्मस्थान म्हटले जाते आणि ते सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जर अंगणात या काही वस्तू असतील, तर त्यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक नुकसान, मानसिक अशांतता व कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. चला तर मग कोणत्या आहेत या 4 गोष्टी त्याबद्दल जाणून घेऊयात.

घराच्या अंगणात 'या' 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय
Vastu Tips
| Edited By: | Updated on: Jun 17, 2026 | 3:57 PM
Share

आपल्या जीवनात घराला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र देखील घराला विशेष महत्त्व देते. अशातच घराचे बांधकाम करण्यापासून ते घरातील वस्तू ठेवण्यापर्यंत आपण वास्तू टिप्सचा अवलंब करत असतो. कारण त्यात घराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने जीवन सुखी होते. मात्र तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर घरात अनेक समस्या निर्माण होतात आणि वास्तुदोष उद्भवतात. वास्तुशास्त्र घराचे महत्त्व त्याच्या अंगणाइतकेच सांगते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणाला ब्रह्मस्थान म्हटले जाते. असे मानले जाते की अंगण हे असे स्थान आहे जिथून संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. वास्तुशास्त्रज्ञ घराच्या अंगणात काही अशा वस्तू असतात ज्या न ठेवण्याचा सल्ला देतात. असे मानले जाते की अंगणात चुकीच्या वस्तू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलह होऊ शकतो. जर या वस्तू अंगणात पडलेल्या असतील, तर त्या लगेच काढून टाका. चला तर मग आजच्या लेखात आपण या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

कचऱ्याचा डब्बा

अंगणात कचरा किंवा कचऱ्याच्या डब्बा तशाच ठेऊन देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार अशा चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अंगणातून कचरा आणि कचऱ्याच्या डब्बा काढून टाकला पाहिजेत.

काटेरी वनस्पती

जर तुमच्या घरातील सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील, तर तुमच्या अंगणातील काटेरी झाडे हे त्याचे कारण असू शकते. तुमच्या घरात काटेरी झाडे असल्यास ती ताबडतोब काढून टाका.

तुटलेल्या वस्तू किंवा भंगार

अंगणात एका कोपऱ्यात तुटलेल्या वस्तू किंवा भंगार पडलेले असल्यास ते काढून टाका. या खराब वस्तू राहूचे प्रतीक मानले जाते. अंगणात भंगार ठेवल्याने कुटुंबाच्या प्रगतीत अडथळा येतो आणि दुर्दैव ओढवू शकते.

शूज आणि चप्पल

अंगणात बूट आणि चपला उघड्यावर ठेवू नयेत. असे मानले जाते की अंगणात बूट आणि चपला ठेवल्याने घराच्या समृद्धीवर परिणाम होतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?