Chanakya Niti : शत्रुवर मात करायची असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 3 सल्ले लक्षात ठेवा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 8:10 AM

आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी त्यांचे शिक्षण, अनुभव आणि तत्त्वज्ञान चाणक्य नीतिमध्ये समाविष्ट केले आहे. आचार्यांची धोरणे वाचून आणि त्यानुसार वागून तुम्ही सहजपणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा शत्रूंना पराभूत करायचे असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

Chanakya Niti : शत्रुवर मात करायची असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 3 सल्ले लक्षात ठेवा
जर तुम्हाला जीवनाचा मार्ग सुलभ करायचा असेल तर आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई : जी व्यक्ती जीवनात यश मिळवते तिला निश्चितच अनेक ज्ञात आणि अज्ञात शत्रू असतात. म्हणूनच प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत प्रवेश केला असेल तर तुमचे विरोधक कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत असतील. कधीकधी हे लोक तुम्हाला अपयशी ठरवण्यासाठी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न देखील करु शकतात. परंतु अशा लोकांनी कधीही घाबरु नये. त्यांना प्रेरक मानले पाहिजे आणि त्यांनी सतर्क राहून स्वतःचा बचाव केला पाहिजे आणि पुढे जात राहिले पाहिजे.

या परिस्थितीत आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी त्यांचे शिक्षण, अनुभव आणि तत्त्वज्ञान चाणक्य नीतिमध्ये समाविष्ट केले आहे. आचार्यांची धोरणे वाचून आणि त्यानुसार वागून तुम्ही सहजपणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा शत्रूंना पराभूत करायचे असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

शत्रूला कधीही कमी लेखू नका

चाणक्य यांच्या मते, अनेक वेळा लोक त्यांच्या यशामध्ये इतके मग्न होतात की ते शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्याला खूप कमकुवत मानू लागतात. अशी चूक कधीही करु नका. जो स्पर्धेच्या उद्देशाने तुमच्यासोबत मैदानात उतरला आहे, त्याला तुमच्यासारखी अनेक प्रकारची माहिती नक्कीच असेल. म्हणूनच शत्रूला कधीही कमकुवत समजू नका. अन्यथा आपलं नुकसान घेऊ शकते. तयारी करत रहा आणि अभिप्राय कधी द्यायचा याचे धोरण ठेवा.

राग टाळा

चाणक्य यांचा असा विश्वास होता की राग तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक हरुन घेतो आणि अशा परिस्थितीत तुम्ही नक्कीच काहीतरी चूक करता. म्हणून लक्षात ठेवा की तुमचा शत्रू तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे भडकावून तुम्हाला क्रोधित करण्याचा प्रयत्न करु शकतो. परंतु तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत रागापासून दूर राहावे लागेल.

हिम्मत हारु नका

चाणक्य म्हणायचे की जर तुमचे ध्येय मोठे असेल तर त्यासाठी तयारी देखील तशी करावी लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत असे ध्येय साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागेल. यासाठी तुम्हाला स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार राहावे लागेल आणि योग्य रणनिती आखून धीराने पुढे जावे लागेल. या धोरणामुळे आचार्य चाणक्यने नंद राजवंश नष्ट केलं आणि चंद्रगुप्तला सम्राट बनवले. म्हणूनच कधीही हार मानू नका. नेहमी धैर्याने आपल्या ध्येयाकडे जात रहा. एक दिवस यश नक्कीच मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या व्यक्तींच्या कर्माचे फळ तुम्हालाही भोगावे लागू शकते, नेहमी योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करा

Chanakya Niti | नाती दृढ करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या, चाणक्य निती काय सांगते…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI