बाल्कनीत चिमणीने घरटे बांधणे शुभ असते की अशुभ? ते ठेवावे की काढून टाकावे?
अनेकादा आपल्या घरात किंवा घराच्या बाल्कनीत पक्षी घरटे बांधत असतात. पण काही पक्षांनी बाल्कनीत घरटे बांधणे शुभ मानले जात नाहीत. त्यातच जर चिमणी या पक्षाने घरात किंवा बाल्कनीत घरटे बांधणे शुभ असते की अशुभ असते. तसेच जर असे दिसले तर ते घरटे काढून टाकावे की नाही? जाणून घेऊयात.

घरातील प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्राशी जोडलेली असते. वास्तूशास्त्रात घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात. ज्यांच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं असतं. अन्यथा अनेक गोष्टी बिघडू शकतात. असे म्हटले जाते की निसर्गाशी जोडलेल्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी अनेक घरांमध्ये आपण हे पाहिलं असेल की काहीजण घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी झाडे लावतात. झाडे शांती आणतात तशीच ती घरात शांतता, सकारात्मक वातावरण निर्माण करतात.
चिमणीने बाल्कनीत किंवा घरात कुठे घरटे बांधणे शुभ असते की अशुभ
वास्तूशास्त्रात अजून एका गोष्टीबद्दल सांगण्यात आलं आहे ते म्हणजे पक्षांचे घरटे. आपण अनेकदा असं ऐकलं असेल की काही पक्षांनी आपल्या घरात किंवा बाल्कनीत घरटे बांधणे अशुभ मानले जाते. पण त्यातच काही पक्षांनी घरटे बांधणे शुभ मानले जाते. अशाचत चिमणीने बाल्कनीत किंवा घरात कुठे घरटे बांधणे शुभ असते की अशुभ. त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेऊयात. तथापि, घरात पक्ष्यांच्या घरट्याचे स्थान आणि स्थिती त्याची उपस्थिती शुभ आहे की अशुभ आहे हे ठरवते.
बाल्कनीवर पक्ष्यांनी घरटे बांधणे
जर घराच्या बाल्कनीत पक्ष्यांनी घरटे बनवले असेल तर लोक विचार करू लागतात की ते शुभ आहे की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते. त्यातही जर चिमणीने घरटे बांधणे शुभ मानले जाते. घरात सुख-शांती नांदते असे मानले जाते. ते सौभाग्याशी देखील संबंधित आहे. यासोबतच घराबाहेरील झाडे आणि वनस्पतींमध्ये पक्ष्यांनी घरटे बांधणे देखील शुभ मानले जाते.
या पक्ष्यांचे घरटे शुभ असते
शास्त्रांनुसार घरात चिमणसोबतच मैना आणि पोपटांची घरटी असणे ही चांगले मानले जाते. त्यांची घरटी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात. याशिवाय, घरात इतर कोणत्याही पक्ष्याची उपस्थिती शुभ नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की पक्षी निसर्गाच्या उर्जेशी संबंधित आहेत आणि म्हणूनच ते घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. तथापि, घरात तुटलेले पक्षांचे पंख, किंवा त्यांनी घर बांधतानाचे असलेले एखादे लाकडाचा किंवा फांदीचा तुकडा सापडणे अशुभ मानले जाते; या गोष्टी घरात सकारात्मक वातावरण आणत नाहीत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
