AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyotish tips: साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय करा, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही!

कठोर परिश्रम आणि मेहनत असूनही, लोक त्यांच्या करिअरमध्ये ते स्थान मिळवू शकत नाहीत, ज्याच्या मागे ते धावत आहेत. एवढेच नाही तर त्यांना अनेकदा संघर्षाला (Struggle) सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की यामागे असे अनेक दोष असू शकतात, ज्याबद्दल व्यक्तीला अजिबात माहिती नसते. हे सर्व त्याच्यासोबत का होत आहे हे त्याला समजत नाही.

Jyotish tips: साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय करा, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही!
साखरेशी संबंधित हे प्रभावी उपाय फायदेशीरImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : कठोर परिश्रम आणि मेहनत असूनही, लोक त्यांच्या करिअरमध्ये ते स्थान मिळवू शकत नाहीत, ज्याच्या मागे ते धावत आहेत. एवढेच नाही तर त्यांना अनेकदा संघर्षाला (Struggle) सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की यामागे असे अनेक दोष असू शकतात, ज्याबद्दल व्यक्तीला अजिबात माहिती नसते. हे सर्व त्याच्यासोबत का होत आहे हे त्याला समजत नाही. असे मानले जाते की असे दोष (Fault) दूर करण्यासाठी ज्योतिषीय उपाय  (Jyotish Shastra)  केले जाऊ शकतात. असे अनेक विशेष उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने दोष दूर होतात. ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या समस्यांचे वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

ग्रह दोष दूर करा

असे मानले जाते की साखरेसाठी ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून ग्रह दोष दूर होतात. यासाठी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करावे लागेल. हा उपाय करण्यासाठी एका कलशात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात साखरेचे काही दाणे टाका. आता हे पाणी सकाळी लवकर सूर्यदेवाला अर्पण करा. या उपायाचा अवलंब केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि ग्रह दोष दूर होतात असे सांगितले जाते.

व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर

जर एखाद्याला व्यवसायात अडथळे येत असतील आणि तोटा होत असेल तर तो त्यावर साखर उपाय करू शकतो. अशा व्यक्तीने साखरेच्या पाण्याचे द्रावण नियमित घ्यावे. तांब्याचे भांडे घेऊन त्यात थोडी साखर टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पूजा केल्यानंतर हा उपाय करावा. तसेच, जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल तर यावेळी तयार केलेले पाणी जरूर प्या. यातून यश मिळू शकते.

हा दोष दूर करणे आवश्यक

असे म्हटले जाते की जर घरात पितृ दोष असेल तर यामुळे केवळ आर्थिकच नाही तर शारीरिक समस्याही तुम्हाला घेरू शकतात. पितृदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये अनेकदा मतभेद होतात. साखरेशी संबंधित उपाय प्रभावी ठरू शकतात. हा उपाय करण्यासाठी पिठाची रोटी करून त्यात साखर मिसळून कावळ्यांना खाऊ घाला. असे म्हणतात की असे करणाऱ्या व्यक्तीला कमी त्रास होतो. हा उपाय अनेक दिवस करणे चांगले मानले जाते.

संबंधित बातम्या : 

Zodiac | ‘या’ दोन राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये करावी लागणार तारेवरची कसरत!

Basoda 2022 : जाणून घ्या शीतला अष्टमीचे महत्व आणि शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?