AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamika Ekadashi 2021 | आज कामिका एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपवास विधी

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानली जाते. मान्यता आहे की जर तुमची कोणतीही इच्छा दीर्घकाळापर्यंत अपूर्ण राहिली असेल तर कामिका एकादशीचे विधिवत व्रत ठेवून तुम्ही देवापुढे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. असे केल्याने भगवान विष्णू तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात.

Kamika Ekadashi 2021 | आज कामिका एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपवास विधी
Lord Vishnu
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानली जाते. मान्यता आहे की जर तुमची कोणतीही इच्छा दीर्घकाळापर्यंत अपूर्ण राहिली असेल तर कामिका एकादशीचे विधिवत व्रत ठेवून तुम्ही देवापुढे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. असे केल्याने भगवान विष्णू तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात (Kamika Ekadashi 2021 Know The Shubh Muhurat And Vrat Vidhi).

अशीही मान्यता आहे की कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते. यावेळी कामिका एकादशीचे व्रत 4 ऑगस्ट रोजी म्हणजेच बुधवारी ठेवण्यात येणार आहे. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या गदा धारण केलेल्या रुपाची पूजा करण्याचा नियम आहे. कामिका एकादशीचे व्रत, शुभ मुहूर्त आणि इतर महत्वाची माहिती जाणून घ्या.

शुभ मुहूर्त

? एकादशीची तिथी प्रारंभ – मंगळवार 03 ऑगस्ट रोजी दुपारी 12:59 पासून सुरू होईल

? एकादशी तिथी समाप्त – बुधवार, 04 ऑगस्ट रोजी दुपारी 03:17 पर्यंत राहील.

उदया तिथीनुसार, या वर्षी कामिका एकादशीचा उपवास 04 ऑगस्ट रोजी ठेवला जाईल. दुसऱ्या दिवशी 05 ऑगस्टला द्वादशी तिथी संध्याकाळी 05.09 पर्यंत राहील. अशा स्थितीत द्वादशीला तुम्ही कधीही व्रताचे पारण करु शकता. परंतु उपवासासाठी सर्वात शुभ वेळ सकाळी 05:45 ते सकाळी 08:26 दरम्यान असेल.

उपवासाची विधी

03 ऑगस्ट रोजी सूर्यास्तानंतर एकादशी उपवासाचे नियम लागू होतील. 03 ऑगस्ट रोजी सूर्यास्तापूर्वी तुम्ही साधे जेवण घ्या. यानंतर, सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ केल्यावर हातात अक्षता आणि फुले घेऊन व्रताचा संकल्प करा, त्यानंतर पूजेला सुरुवात करा. सर्वप्रथम भगवान विष्णूला फळे, फुले, तीळ, दूध, पंचामृत इत्यादी अर्पण करा. यानंतर कामिका एकादशीची व्रत कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा.

जर तुम्ही निर्जला उपवास ठेवू शकत असाल तर ते उत्तम आहे. अन्यथा तुम्ही फळांचं सेवन करु शकता. रात्री देवाचे ध्यान करा आणि भजन कीर्तन करा. एकादशीच्या रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ब्राह्मणांना जेवण द्या आणि त्याच्या क्षमतेनुसार दान करा. त्यानंतरच अन्नाचे सेवन करा. दशमीच्या रात्रीपासून द्वादशीच्या दिवसापर्यंत ब्रह्मचर्य पाळा. कोणाची निंदा करु नका किंवा टीका करु नका. परमेश्वराची भक्ती करा.

Kamika Ekadashi 2021 Know The Shubh Muhurat And Vrat Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शिवरात्रीचे थोर महात्म्य; जाणून घ्या शिवशंकरांच्या चार प्रहरातील पूजेचे महत्त्व व विधी

मंगळागौरी व्रतामागे आहे ही कथा; जाणून घ्या तिथी, पूजा विधीचे महत्त्व

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.