Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात भक्तांची गर्दी, असे आहे धार्मिक महत्त्व

Kartiki Ekadashi 2023 कार्तिकी एकादशी निमित्त लाखो भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी आजपासून 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. देवाच्या शयन कक्षातला पलंग काढून ठेवण्यात आला आहे. देवाला क्षीण येऊ नये म्हणून पाठीमागे मखमलीचा लोड लावण्यात आला आहे तसेच लिंबू पाण्याचा नैवेद्यही दाखवण्यात येणार आहे.

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात भक्तांची गर्दी, असे आहे धार्मिक महत्त्व
कार्तिकी एकादशी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 11:00 PM

मुंबई : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2023) म्हणजे वैष्णवांसाठी विशेष सोहळ्याचा दिवस. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पाऊलं पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. वर्षभरात एकवीस एकादशी असतात त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. आषाढी एकादशीला जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. म्हणूणच या एकादशीला देवउठी एकादशी देखील म्हणतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते आणि लग्न, मुंज यासाख्या विधींनाही सुरूवात होते. या वर्षी कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे.

24 तास घेता येणार विठूरायाचे दर्शन

कार्तिकी एकादशी निमित्त लाखो भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी आजपासून 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. देवाच्या शयन कक्षातला पलंग काढून ठेवण्यात आला आहे. देवाला क्षीण येऊ नये म्हणून पाठीमागे मखमलीचा लोड लावण्यात आला आहे तसेच लिंबू पाण्याचा नैवेद्यही दाखवण्यात येणार आहे. या काळात देवाचे राजोपचार देखील बंदरातील. ऑनलाईल दर्शन आणि व्हिआयपी दर्शन देखील या काळात बंद राहाणार आहे.

यंदा प्रथमच कार्तिकी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास चार ठिकाणी आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तासंतासदर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा, त्यांची बैठक व्यवस्था आणि त्यांना इतर गरजेनुसार वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत चार ठिकाणीही स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

आषाढी आणि कार्तिकी एकादशीत काय फरक आहे?

दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. त्यामुळे आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोपेतून जागे होतात. त्यामुळे म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु योग निद्रेत असतात. त्यामुळे चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतात, अशी मान्यता आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर लग्न समारंभांना सुरूवात होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.