AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 4 वस्तू घरातील मंदिरात ठेवा, वाढेल सुख, शांती आणि समृद्धी, काय सांगतं वास्तूशास्त्र?

सनातन धर्मात मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरात मंदिर असते. पण घरातील मंदिरात 'या' 4 वस्तू ठेवल्याने सुख, शांती आणि समृद्धी वाढेल, तर जाणून घ्या कोणत्या आहेत, त्या वस्तू...

'या' 4 वस्तू घरातील मंदिरात ठेवा, वाढेल सुख, शांती आणि समृद्धी, काय सांगतं वास्तूशास्त्र?
| Updated on: Jun 09, 2026 | 3:03 PM
Share

सनातन धर्मात मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. घरातील मंदिर हे शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे आणि पवित्र केंद्र आहे. तिथे दररोज पूजा केल्याने भक्ताच्या मनात असीम शांती लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो. पण घरातील मंदिरात कोणत्या वस्तू कशा ठेवायच्या? याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. प्रत्येक हिंदू घरात एक मंदिर असतं. या मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती, फोटो आणि पूजेचे साहित्य ठेवलेले असतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकदा ज्ञानाच्या अभावामुळे लोक अशा काही गोष्टी ठेवत नाहीत, ज्या घराचे सुख, शांती आणि समृद्धी वाढवतात. फार कोणाला या गोष्टींबद्दल फारशी माहिती देखील नसते. तर त्या कोणत्या वस्तू आहेत, ज्या घरातील मंदिरात असल्या पाहिजे, जाणून  घ्या.

ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील देवघरात कलश स्थापित केल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. शिवाय, त्यामुळे तुमचे सुख, शांती आणि समृद्धी वाढू शकते. इतकेच नाही, तर घरात कलश ठेवल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद घरात येऊ शकतो.

घरातील पूजा किंवा इतर शुभ कार्यांमध्ये गंगाजलाला खूप महत्त्व आहे. घरात हे गंगाजल शिंपडल्याने व्यक्ती आणि घराचे ठिकाण पवित्र होते. त्यामुळे घरात गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, घरात गंगाजल ठेवल्याने व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांना देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो.

मंदिरात इतर वस्तूंप्रमाणे शंख ठेवणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हालाही शुभ परिणाम हवे असतील, तर तुम्ही तुमच्या घरातील देवघरात दक्षिणाभिमुख शंखात गंगाजल ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. शिवाय, भगवान कृष्णाच्या प्रसादात तुळशीच्या पानांना खूप महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की प्रसादात तुळशीची पाने ठेवल्याने मंदिराची पवित्रता वाढते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती