जाणून घ्या आरती करताना घंटी का वाजवतात?, काय आहे याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

prajwal dhage

prajwal dhage |

Updated on: Feb 11, 2021 | 12:07 PM

जाणून घ्या आरती करताना घंटी का वाजवतात?, काय आहे याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व (know about Religious and scientific significance of bell)

जाणून घ्या आरती करताना घंटी का वाजवतात?, काय आहे याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
घंटीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

मुंबई : सनातन धर्मामध्ये देवळात गेल्यानंतर आणि देवाची आरती करताना घंटी वाजवण्याची प्रथा आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तेथे घंटी लावलेली असतेच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, देवळात घंटी का असते? देवळात घंटी लावण्याचे आणि घंटी वाजवण्यामागे काय आहे कारण? जाणून घेऊया घंटीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व. (know about Religious and scientific significance of bell)

पुराणात असे लिहिले आहे की, जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा एक नाद ऐकू आला होता. घंटी त्याचेच प्रतिक मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार घंटी वाजवून भक्त देवासमोर आपली उपस्थिती दर्शवतात.

शरीरचक्र कार्यरत होते

घंटी वाजवल्याने देवाच्या मूर्तीत चेतन्य येते. याशिवाय तेथे उपस्थित लोकांमध्ये आपोआप भक्तीभाव जागृत होतो. देव तुमची प्रार्थना आणि भोग स्विकार करतो. ज्योतिष शास्त्रानुसार घंटीच्या आवाजाने आपल्या शरीरातील सातही चक्र काही वेळ सक्रिय होतात. यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मानसिक ताण कमी होतो

घंटी वाजवल्यामुळे वातावरणात एक स्पंदनं निर्माण होते. ही स्पंदनं दूरवर पसरतात. यामुळे त्या परिसरातील विषाणू, जीवाणू आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात. यामुळे तेथील वातावरण पवित्र होऊन नकारात्मकता दूर होते. याशिवाय घंटी वाजवल्यामुळे तुमचे मन आणि मेंदूवर विशेष प्रभाव पडतो. घंटीच्या आवाजामुळे मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भाग संतुलित करतात. तुमच्या डोक्याचा ताण कमी करतात आणि एकग्रता वाढवतात.

जाणून घ्या किती प्रकारच्या असतात घंटी

1. घरी पूजा करताना वाजवण्यात येणारी घंटी लहान आकाराची असते, तिला गरुड घंटी म्हटले जाते.

2. मोठ्या आकाराच्या घंटीला घंटा असे म्हटले जाते. या घंटाचा आवाज दूरपर्यंत जातो. अशा घंटा मंदिरात असतात.

3. पितळेची गोल प्लेट असते. याला लाकूड किंवा हाथोडीने वाजवले जाते.

4. मंदिराच्या प्रवेशद्वारवर लावलेली घंटी लहान आणि मोठ्या दोन्ही आकारात असते. याला द्वार घंटी म्हटले जाते. बहुतांश लोक ही घंटी घरातील मंदिरातही लावतात. (know about Religious and scientific significance of bell)

इतर बातम्या

Gold/Silver Rate Today: सोन्याचे नवे दर जारी, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI