Promise Day 2021 | ‘प्रॉमिस डे’च्या खास दिवशी प्रिय व्यक्तीला द्या ‘ही’ वचनं, नातं होईल अधिक दृढ!

व्हॅलेंटाईन आठवड्याच्या पाचव्या दिवशी अर्थात 11 फेब्रुवारी रोजी ‘प्रॉमिस डे’ साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या जोडीदारास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्याचे वचन द्या.

Promise Day 2021 | ‘प्रॉमिस डे’च्या खास दिवशी प्रिय व्यक्तीला द्या ‘ही’ वचनं, नातं होईल अधिक दृढ!
प्रॉमिस डे
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 11:43 AM

मुंबई : व्हॅलेंटाईन आठवड्याच्या पाचव्या दिवशी अर्थात 11 फेब्रुवारी रोजी ‘प्रॉमिस डे’ साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या जोडीदारास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्याचे वचन द्या. त्यांच्यावर नेहमी मनापासून प्रेम करण्याचे वचन द्या. या व्यतिरिक्त आणखी अशी काही आश्वासने आहेत, जी आपण आपल्या जोडीदाराला देणे आणि ती पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते नेहमीच दृढ राहील, तसेच आपण नेहमी एकत्र राहाल (Valentine Week Special Promise Day 2021 important promises).

नेहमी साथ देण्याचे वचन द्या.

जोडीदाराची इच्छा असते की आपण नेहमी त्यांच्याबरोबर असले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक कठीण आणि वाईट काळात ते तुमच्याबरोबर असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, आपला आनंद देखील एकत्रित साजरा करा. याव्यतिरिक्त आपल्याला आपल्या जोडीदारामध्ये आणखी काय पाहिजे! म्हणून प्रॉमिस डे दिवशी त्यांना नेहमी साथ देण्याचे वचन द्या.

आदर राखण्याचे वचन द्या.

कोणत्याही नात्यात आदर असणे खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या जोडीदाराचा नेहमी आदर केला पाहिजे. जरी आपापसांत मतभेद चालू असतील, तरीही आपल्या साथीदाराबद्दल कधीही चुकीचे बोलू नका आणि त्यांना पूर्ण आदर द्या. या नात्यात त्यांचा सन्मान होत नाही, असे त्यांना कधीही वाटू देऊ नका.

प्रत्येक निर्णयामध्ये बरोबरीने समर्थन द्या.

दोघांनीही आयुष्यातील प्रत्येक मोठे निर्णय एकत्र घेतले पाहिजेत. हे एक वचन आहे, जे प्रत्येक जोडीसाठी अतिशय विशेष आहे. आपण दोघांशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेतल्यास आपल्या जोडीदाराचे मत विचारात घ्या. एकत्र घेतलेले निर्णय अगदी बरोबर असतात, अशा निर्णयांमध्ये दु:ख होण्याची शक्यता देखील कमी असते (Valentine Week Special Promise Day 2021 important promises).

आनंदी ठेवण्याचे वचन द्या.

आपल्या जोडीदारास कायम आनंदित ठेवण्याचे वचन द्या. जेव्हा दोघे आनंदी असतात तेव्हाच नातं टिकतं. जर एखाद्याचाही आनंद कमी झाला, तर ते नाते कमकुवत होऊ लागते, म्हणून वचन द्या की, आपण आपल्या जोडीदारास नेहमी आनंदी ठेवाल.

खोटी आश्वासने देऊ नका.

प्रॉमिस डेच्या दिवशी कोणतेही खोटे आश्वासन देऊ नका, कारण जर आपण नंतर कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही, तर ते वचन आपले संबंध खराब करू शकते.

(Valentine Week Special Promise Day 2021 important promises)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.