अवघ्या विश्वाला हादरवणाऱ्या ‘तांडव’चं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या महादेवाच्या या निर्मितीबद्दल…

नटराज आणि भगवान शिव यांच्या नृत्य प्रकाराशी संबंधित असलेल्या ‘तांडव’बद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला त्याबद्दल जाणून घेऊया...

अवघ्या विश्वाला हादरवणाऱ्या ‘तांडव’चं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या महादेवाच्या या निर्मितीबद्दल...
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 7:09 PM

मुंबई : अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची ‘तांडव‘ ही वेब सीरीज  प्रदर्शित झाली आहे. वेब सीरीज प्रदर्शित होताच मोठी खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण वाद आता थेट रस्त्यावर उतरला आहे. या वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा दर्शकांचा आरोप आहे. ‘तांडव’ वेब सीरीजमध्ये ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत (Know about Tandav dance of Shiva in natraj form).

‘तांडव’चा हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी त्वरित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या अधिकाऱ्यांना बोलावले. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी ‘तांडव’विरोधात आंदोलन करून, वेब सीरीजवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करत आहेत. वास्तविक या वेब सीरीजविषयी अनेक वादग्रस्त मुद्दे मांडले जात आहेत. सर्वप्रथम, या वेब सीरीजचे नाव भगवान शिव यांच्याशी थेट जोडलेले आहे. आशयाच्या नावाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दुसरे म्हणजे, जर मालिकेचे नाव काही पौराणिक गोष्टींशी जोडले गेले असेल, तर त्यात अश्लीलता कितपत न्याय्य आहे?, असे प्रश्न केले जात आहेत.

या सर्व गोष्टींवरून वाद सुरू असून, तो सोडवण्याचा मार्गही शोधला जात आहे. पण नटराज आणि भगवान शिव यांच्या नृत्य प्रकाराशी संबंधित असलेल्या ‘तांडव’बद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला त्याबद्दल जाणून घेऊया…

संगीताचे जनक शिव

वेदांनुसार निसर्गाच्या प्रत्येक कणाकणांत संगीत अस्तित्त्वात आहे. भगवान शिवला अर्थात महादेवांना या संगीताचे जनक मानले जाते. शिव महापुराणात असे म्हटले आहे की, या जगातील महादेवाच्या पहिल्या संगीताची कोणालाही माहिती नव्हती. नंतर, जर संगीत निसर्गाचा एक भाग बनला, तर त्यामध्ये महादेवाची महत्त्वाची भूमिका आहे. भगवान शिवाविषयी असे म्हटले जाते की, या विश्वात प्रथम शिवाची आगमन झाले होते. वास्तविक, तांडव ही नृत्याची एक शैली आहे जी महादेवाशी संबंधित आहे.

दोन प्रकारचे तांडव नृत्य

भगवान शिव दोन प्रकारचे तांडव नृत्य करतात. जेव्हा त्यांचा राग येतो आणि रुद्र स्वरूपात, तांडव नृत्य करतात. तर, दुसरे तांडव करताना ते डमरू वाजवतात. शिव जेव्हा डमरू वाजवून नाचतात तेव्हा, ते पूर्ण आनंदात असल्याचे मानले जाते. भगवान शिवाचा हा ‘तांडव’ नटराज स्वरूपाचे प्रतीक आहे. तांडवाबद्दल असे म्हणतात की, जेव्हा भगवान शिव हे नृत्य करतात, तेव्हा ते त्यांच्या उत्कृष्ट रूपात असतात. येथे नटराजाचा अर्थ ‘नट’ म्हणजेच कलेशी निगडित आहे आणि भगवान शिव यांना कलेचा सर्वोच्च प्रेमी मानले जाते (Know about Tandav dance of shiva in natraj form).

भगवान शंकराची दोन रूपं

‘तांडव’शी संबंधित भगवान शंकराची दोन रूपे आहेत. त्यांच्या या दोन रूपांपैकी पहिले म्हणजे रौद्र रूप, ज्याला विनाशकारी रुद्र तांडव म्हणतात. तर, दुसरे रूप आनंददायक आहे आणि त्याला ‘आनंद तांडव’ म्हटले जाते. रौद्र तांडव करणाऱ्या महादेवाला रुद्र म्हणतात. तर आनंदाने तांडव करणाऱ्या महादेवाच्या रुपाला नटराज म्हणतात. शास्त्रानुसार शिव जेव्हा आनंद तांडव करतात, तेव्हा विश्वाची निर्मिती होते. पण जेव्हा ते रौद्र तांडव करतात, तेव्हा विश्वात प्रलय होतो. असे म्हणतात की, भगवान शिव जेव्हा रौद्र तांडव करतात, तेव्हा जगाचा नाश होतो.

नटराजाच्या 4 भुजा

‘नटराज’ रुपातील महादेवाची प्रतिमा पाहिल्यास त्यात चार हात दिसतात. त्यांच्याभोवती अग्निचे एक मंडळ दिसते. त्यांनी उजव्या हातात डामरू धरला आहे. येथे डमरूचा आवाज सृष्टीचे प्रतीक आहे, ज्याचा नाद सतत निसर्गामध्ये घुमत राहतो. दुसर्‍या हातात आग आहे. येथे आग विनाशाचे प्रतीक आहे. म्हणूनच, नटराजांच्या रूपात भगवान शिव सृष्टीचे तारक तसेच विनाशाचे प्रतीक आहेत. दुसरा उंचावलेला उजवा हात लोकांच्या हितासाठी, आशीर्वाद देण्याच्या पवित्र्यामध्ये आहे.

सृष्टीची निर्मिती आणि विनाश

भगवान शिवाचा दुसरा डावा हात त्याच्या उंचावलेल्या पायाकडे निर्देशित करतो. याचा अर्थ असा की, शिव मोक्षाचा मार्ग सुचवतो. भगवान शिव यांच्या या स्वरूपावरून हे स्पष्ट होते की, ते सृजनाबरोबरच विनाशही करू शकतात. त्यांच्या सभोवताल उगवत्या ज्वाळा या विश्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या शरीरावर सापांची एक कुंडलिनी देखील आहे, जी सामर्थ्यचे प्रतिक आहे. शिवची ही संपूर्ण आकृती ‘ऊं’ आकारात दिसते, ज्याबद्दल असे म्हणतात की विश्व पूर्णपणे शिवात सामावलेले आहे.

(Know about Tandav dance of shiva in natraj form)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.