AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शहरात दहनापूर्वी केली जाते रावणाची पूजा, निघते शोभायात्रा… जाणून घ्या अनोखी परंपरा

भारतात असे एक शहर आहे, जेथे लंकेचा राजा रावण याची पूजा केली जाते आणि दहनापूर्वी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाते. जाणून घ्या ही अनोखी परंपरा कोणत्या शहरात आहे.

या शहरात दहनापूर्वी केली जाते रावणाची पूजा, निघते शोभायात्रा... जाणून घ्या अनोखी परंपरा
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 1:28 PM
Share

देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे पुतळे जाळण्याची परंपरा आहे. पण भारतात एक शहर असे आहे, जिथे दसरा उत्सवाची सुरुवात तिन्ही लोकांवर विजय मिळवणाऱ्या रावणाच्या पूजेने आणि भव्य शोभायात्रा काढून केली जाते. एवढेच नाही तर शहरात रावणाची भव्य शोभायात्रा सुद्धा काढली जाते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आजही ही अनोखी परंपरा पाळली जाते.

दरवर्षी पितृपक्षातील एकादशीला ऋषी भारद्वाज मुनींच्या आश्रमातील शिवमंदिरात बाकायदा रावणाचे रूप धारण केलेल्या व्यक्तीची पूजा करून आरती केली जाते आणि त्याला बलशाली दशाननाच्या रूपात सजवले जाते. या विशेष पूजेनंतर लंकाधिपती आपल्या रथावर स्वार होऊन भव्य शोभायात्रेत सहभागी होतात.

बदलत्या काळासोबत जुन्या गोष्टी बदलत आहेत आणि आता रावणाच्या शोभायात्रेतही नवनवीन प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आकर्षक लाईट, डीजे आणि विविध प्रकारच्या म्युझिक साउंडसोबत बँड या शोभायात्रेत सहभागी होतात. आकर्षक रोषणाई आणि बँडच्या ताफ्यासोबत लंकाधिपती रावणाची शोभायात्रा त्यांच्या कुळासह आणि मायावी सेनेसह प्रयागराजच्या रस्त्यांवरून निघते. स्वागत करण्यासाठी आणि शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्यांच्या कडेला लोकांची गर्दी पहायला मिळते. रावणाच्या शोभायात्रेच्या नावाने निघणाऱ्या या शोभायात्रेसोबतच प्रयागराजमध्ये दसरा उत्सवाची सुरुवात होते.

प्रयागराजमध्ये लंकाधिपती रावणाची त्यांच्या विद्वत्तेमुळे पूजा केली जाते. यामुळे शहरातील कटरा परिसरात विद्वान महापंडित रावणाची स्थानिक जनता पूजा करते आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन देखील केले जात नाही. पण रावणाचा पुतळा दारागंज रामलीला कमेटीकडे सोपवला जातो, जे विजयादशमीच्या दिवशी त्या पुतळ्याचे दहन करतात. प्रयागराजमध्ये असे मानले जाते की या दिवसापासूनच दसऱ्याची सुरुवात होते. यानिमित्ताने प्रयागराजमध्ये तीनही लोकांचा विजेता रावणाची शाही सवारी यावर्षीही पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली.

प्रयागराज मध्ये अशी असते रावणाची शोभायात्रा

या अनोख्या शोभायात्रेत पूर्वी लंकाधिपती हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या विशालकाय हौद्यावर स्वार होत असत. पण बदलत्या काळामुळे हत्ती आणि घोड्यांना शोभायात्रेत सहभागी करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता रावण आपल्या रथावर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी होतात. या शोभायात्रेत रावणाची पत्नी महाराणी मंदोदरी व परिवारातील इतर लोक घोड्यांवर व वेगवेगळ्या रथांत विराजमान असतात.

दशाननाच्या रथाच्या अगदी पुढे त्यांची मायावी सेना वेगवेगळ्या रथांवर स्वार होऊन चालते. फुलांचा वर्षाव, विजयाची धून वाजवणारे बँड पथक आणि आकर्षक लाईट्सच्या दरम्यान रावण आणि त्यांच्या परिवारातील लोकांचे ठिकठिकाणी असे भव्य स्वागत केले जाते, जणू दशानन पुन्हा एकदा तीनही लोक जिंकून लंकेत परतले आहेत. विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीच्या उदगम स्थळी आणि ऋषी भारद्वाज यांच्या नगरी प्रयागराजमध्ये महाराजा रावणाची त्यांच्या विद्वत्तेमुळे पूजा केली जाते. या आयोजन कमिटीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार ही अतिशय अनोखी परंपरा आहे.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात