Wedding Muhurat | 22 एप्रिलपासून पुन्हा ‘शुभ मंगल सावधान’, जाणून घ्या डिसेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त

वर्ष 2021 मध्ये विवाहाचे मुहूर्त अत्यंत कमी आहेत (Shubh Muhurat For Marriages In 2021). जानेवारी महिन्यात फक्त एक मुहूर्त होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:20 PM, 6 Apr 2021
Wedding Muhurat | 22 एप्रिलपासून पुन्हा 'शुभ मंगल सावधान', जाणून घ्या डिसेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त
Marriage

मुंबई : वर्ष 2021 मध्ये विवाहाचे मुहूर्त अत्यंत कमी आहेत (Shubh Muhurat For Marriages In 2021). जानेवारी महिन्यात फक्त एक मुहूर्त होता. त्यानंतर गुरु आणि शुक्र तारा अस्त झाल्याने एप्रिलपर्यंत लग्न थांबली होती. पण आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. शुक्र ताराही 18 एप्रिलला उदयास येणार आहे. शुक्र ताऱ्याच्या उदयानंतर 22 एप्रिलला विवाहाचा शुभ मुहूर्त असेल (Know The All Shubh Muhurat For Marriages In 2021 Will Start From 22 April Till December).

19 जानेवारीपासून गुरु तारा अस्त झाला होता आणि 16 फेब्रुवारीपर्यंत हीच स्थिती होती. तर 16 फेब्रुवारीपासून शुक्र तारा अस्त झाला होता ज्याचा आता 18 एप्रिलला उदय होणार आहे. गुरु आणि शुक्र तारा अस्त झाल्याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लग्नकार्य हाऊ शकणार नाही. चौथ्या आठवड्यापासून लग्नाचा शुभ मुहूर्त सुरु झाला आहे. हे जुलैपर्यंत चालेल, यानंतर लग्न थेट नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होईल.

15 जुलैपासून पुन्हा तीन महिन्यांपर्यंत विवाहकार्य स्टॉप

22 एप्रिल ते 15 जुलै या कालावधीत लग्नाचे एकूण 37 मुहूर्त असतील. 15 जुलैनंतर भगवान विष्णू निद्रा स्थितीत जातील. देवाच्या निद्रा स्थितीदरम्यान विवाह इत्यादी मंगलकार्य करण्यास मनाई असते. यानंतर देवउठनी एकादशीने लग्नांची सुरुवात होईल. म्हणजेच 15 जुलैनंतर पुढील शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबरला असेल. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान एकूण 13 मुहूर्त असतील. अशाप्रकारे, जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत लग्नासाठी एकूण 51 शुभ मुहूर्त आहेत.

वर्षभरातील 51 शुभ मुहूर्ताच्या तिथी

🔷 जानेवारी : 18

🔶 एप्रिल : 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 30

🔷 मे : 1, 2, 7, 8, 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29, 30

🔶 जून : 3, 4, 5, 16, 20, 22, 23, 24

🔷 जुलै : 1, 2, 7, 13, 15

🔶 नोव्हेंबर : 15, 16, 20, 21, 28, 29, 30

🔷 डिसेंबर : 1, 2, 6, 7, 11, 13

Know The All Shubh Muhurat For Marriages In 2021 Will Start From 22 April Till December

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या चार राशींना आवडतं वर्चस्व गाजवायला, तुमची राशी तर नाही ना यात?

जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?