AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दिशेला कधीच घड्याळ लावू नये, अन्यथा घरात येते नकारात्मकता, कोणती दिशा योग्य?

अनेकजण घरात मोकळ्या दिसणार्‍या जागेत घड्याळ लावतात. पण यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला घड्याळ लावू नये. जाणून घ्या सविस्तर

या दिशेला कधीच घड्याळ लावू नये, अन्यथा घरात येते नकारात्मकता, कोणती दिशा योग्य?
| Updated on: Jul 18, 2026 | 6:22 PM
Share

घरात भिंतीवर घड्याळ लावणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. नवीन घड्याळ आणल्यानंतर अनेकजण उपलब्ध असलेल्या कोणत्याही भिंतीवर ते लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याचीही एक विशिष्ट दिशा सांगितली जाते. लोकमान्यतेनुसार योग्य दिशेला घड्याळ लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौहार्द वाढण्यास मदत होते तर चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात असे मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व या दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. पूर्व दिशा ही देवांचा राजा इंद्र यांच्याशी संबंधित मानली जाते. या दोन्ही दिशांमध्ये भिंतीवर घड्याळ लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे अडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते तसेच आर्थिक अडचणी कमी होण्यास सहाय्य होते, अशी लोकमान्यता आहे.

उत्तर किंवा पूर्व दिशा उपलब्ध नसेल तर?

अनेक घरांमध्ये उत्तर किंवा पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावण्यासाठी जागा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर उत्तर किंवा पूर्व दिशा उपलब्ध नसेल तर पश्चिम दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावणे हा योग्य पर्याय मानला जातो. पश्चिम दिशा उत्तर किंवा पूर्वइतकी शुभ मानली जात नसली तरी या दिशेला घड्याळ लावल्याने कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत असे मानले जाते. त्यामुळे तो सुरक्षित पर्याय म्हणून स्वीकारला जातो.

दक्षिण दिशेला घड्याळ लावणे टाळावे

वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा मानली गेली आहे. त्यामुळे या दिशेला भिंतीवर घड्याळ लावणे अशुभ मानले जाते. लोकमान्यतेनुसार दक्षिणेकडील भिंतीवर घड्याळ लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो या दिशेला घड्याळ लावणे टाळावे, असा सल्ला दिला जातो.

अस्वीकरण : या वृत्तातील माहिती ही पारंपरिक वास्तुशास्त्र, लोकमान्यता आणि प्रचलित श्रद्धांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक किंवा सांख्यिकीय पुरावा उपलब्ध नाही. ही माहिती आरोग्य, आर्थिक, कायदेशीर किंवा अन्य तज्ज्ञ सल्ल्याचा पर्याय नाही. वाचकांनी आपल्या विवेकाने या माहितीचा वापर करावा.

Follow Us
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!