AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रयागराज पुन्हा जाम; रस्त्यावर अडकले लोकं; रेल्वेही रद्द, लहान,वृद्ध सर्वांचीच अन्न-पाण्यासाठी तळमळ

प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडींचं भिषण चित्र पाहायला मिळालं आहे. रस्त्यांवर वाहनांसोबत लोक अडकली आहेत तर रेल्वे रुळावरही लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडींत अडकलेली लोकं अक्षरश: भुकेनं आणि तहानेने व्याकूळ झाले आहेत. 

प्रयागराज पुन्हा जाम; रस्त्यावर अडकले लोकं; रेल्वेही रद्द, लहान,वृद्ध सर्वांचीच अन्न-पाण्यासाठी तळमळ
| Updated on: Feb 09, 2025 | 5:53 PM
Share

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात भारतातून लोक येत आहेत. महाकुंभात स्नान करण्यासाठी रोज लाखो लोकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे तुफान गर्दी तर आहेच पण सोबतच अनेक दुर्घटनाही घडाताना दिसत आहेत. मग त्या घटना गर्दीमुळे चेंगराचेंगरी झालेल्या असो किंवा मग ट्राफिक जामच्या.

गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये वाहतूककोंडी होऊन तब्बल 18-19 तासांपासून लोकं त्या ट्राफिकमध्ये अडकले होते. यावेळी या वाहतुक कोंडीतून सुटण्यासाठी लोकांनी मदतसाठी विनंती केली होती. सर्वा भाविकांना अक्षरश: तसंच अडकून पडण्याची वेळ आली होती.

प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडींचं भिषण चित्र

मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडींचं भिषण चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान, प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी आहे. रस्त्यांवर लोकांची आणि वाहनांची तुफान गर्दी दिसत आहे. लोकं भुकेले आणि तहानलेले आहेत.

 रेल्वे रुळावरही प्रचंंड गर्दी 

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गर्दी कमी झाल्याचे वृत्त होतं, तर आखाड्यांचे साधू आणि संतही परतीच्या प्रवासाला निघाल्याचं म्हटलं जात होतं. या बातम्यांनंतर, पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभात पोहोचल्याचं चित्र समोर आलं.

प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जे लोकं आत अडकले होते ते आतच राहिले. रेल्वे स्टेशनवरून मोठ्या संख्येनं गर्दी रेल्वे रुळावरून पुढे जाताना दिसत आहे.

अडकलेले लोक अन्न आणि पाण्यासाठी व्याकूळ

प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असल्याचं म्हटलं जात आहे. परिस्थिती अशी आहे की लहान मुले, मोठे, वृद्ध आणि इतर भाविक वाहतूक कोंडीत अडकले असून ते अन्न आणि पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. यावर सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही ट्विट करून लोकांसाठी तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाकुंभात सर्वत्र भुकेले, तहानलेले, त्रासलेले आणि थकलेले यात्रेकरू आहेत. त्यांनी राज्य सरकारला मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचे आणि तातडीने व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

सर्व गाड्या रद्द

प्रयागराज रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता, सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात अडकलेले भाविक रेल्वे ट्रॅकवरूनच त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात आहेत.

अखिलेश यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर अडकलेले दिसतात आणि वाहने मध्येच अडकलेली दिसत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारला महाकुंभमेळ्यात अडकलेल्या लाखो भाविकांसाठी आपत्कालीन व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्या मार्गावर आहे जाम ?

अखिलेश यादव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की लखनौच्या बाजूने 30 किलोमीटरच्या आधीपर्यंत सर्वत्र जाम आहे, तर रीवा रोडच्या बाजूने 16 किलोमीटरपर्यंत जाम आहे.

वाराणसीपासून 12 ते 15 किलोमीटर अंतराआधीपर्यंत वाहतूक कोंडी आहे. स्टेशनवर इतकी गर्दी आहे की लोक ट्रेनच्या इंजिनमध्येही घुसल्याचं चित्र दिसत आहे. इतक्या मोठ्या गर्दीत लोकांना त्रास होत आहेच, तसेच शहरातील सामान्य जीवनावरही परिणाम होत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.