Chanakya Niti : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशाची चिंता

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात. अशा लोकांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो. अशा लोकांना नेहमीच गरीबीचा सामना करावा लागतो. शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की, सकाळी लवकर उठल्याने तुमचा दिवस चांगला होतो.

Chanakya Niti : 'या' लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशाची चिंता
'या' लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशाची चिंता

नवी दिल्ली : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्राचे महान जाणकार होते. आजही लोक त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचे पालन करतात. त्याचप्रमाणे चाणक्याच्या नीतीचा अवलंब केल्यास जीवनात अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. त्यांच्या नीतिचा अवलंब केल्याने जीवनात नेहमीच आनंद राहील. चाणक्यने आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली आहेत. लोकांच्या वर्तनाचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे त्यांनी आपल्या नीतिशास्त्र पुस्तकात सांगितले. जीवनाशी संबंधित सर्व पैलूंबद्दल नीती सांगितली गेली आहे. चाणक्याने नीतिशास्त्रात सांगितले की, व्यक्तीच्या जीवनासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. चाणक्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या काही सवयींमुळे पैसा त्याच्यासोबत कधीच टिकत नाही, असे लोक नेहमीच गरीबीत आयुष्य घालवतात. (Lakshmi’s grace is not on these people; They are always worried about money)

सकाळी उशीरापर्यंत झोपणारे

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात. अशा लोकांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो. अशा लोकांना नेहमीच गरीबीचा सामना करावा लागतो. शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की, सकाळी लवकर उठल्याने तुमचा दिवस चांगला होतो.

साफ-सफाई न करणे

शास्त्रात असेही म्हटले आहे की जिथे स्वच्छता नाही तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, जे शारीरिक स्वच्छता राखत नाहीत किंवा दात स्वच्छ ठेवत नाहीत, त्यांच्यावर आई लक्ष्मीची कृपा राहत नाही.

अति खाणे

चाणक्यच्या मते, जे लोक जास्त खातात, ते स्वतःला दारिद्र्याकडे घेऊन जातात. जास्त खाणे त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते. अतिरेकी कोणतीही गोष्ट हानिकारक आहे. अशा लोकांना अन्न आणि पैशाची कमतरता असते.

कठोर बोलणारे

आचार्य चाणक्य म्हणतात की नेहमी गोड बोलावे. जे लोक गोड बोलतात ते सर्वांना प्रिय असतात आणि समाजात त्यांना नेहमीच आदर मिळतो. कठोरपणे बोलल्याने संबंध बिघडतात. अशा लोकांच्या घरात आई लक्ष्मी वास करत नाही. (Lakshmi’s grace is not on these people; They are always worried about money)

इतर बातम्या

Happy Birthday Kane Williamson : 15 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, 37 शतकं, WTC चा चषक, न्यूझीलंडचा कर्णधार केनचा वाढदिवस

ट्रेनचा एक छोटा हॉर्न म्हणजे ऑल इज वेल आणि सतत वाजला तर धोका! जाणून घ्या इतर 9 हॉर्नबद्दल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI