AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चातुर्मासात महादेवाला ‘या’ 10 वस्तू अर्पण करून करा प्रसन्न, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण…

देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि या चार महिन्यांत पृथ्वीची जबाबदारी भगवान शंकर म्हणजेच महादेव यांच्या हातात येते. तर या दिवसांमध्ये तुम्ही महादेवाची मनापासून पूजा उपासना केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग आजच्या या लेखात याबद्दल जाणून घेऊयात...

चातुर्मासात महादेवाला 'या' 10 वस्तू अर्पण करून करा प्रसन्न, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण...
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Updated on: Jul 07, 2025 | 3:27 AM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, दिवस व महिन्याचं खास महत्त्व आहे. जीवनात सुख,शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रत्येकजण देवदेवतांची आराधना करतात. अशातच लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे. चातुर्मासात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. सनातन धर्मात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच चातुर्मास हा उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवसांमध्ये केवळ भगवान विष्णुंचीच नाहीतर महादेवाची ही उपासना आराधना केली जाते. कारण चातुर्मास संपूर्ण पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या महादेवाची पूजा केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

चार्तुमासादरम्यान भगवान विष्णुंसोबतच भगवान शंकरांची पूजाही करावी. रोज सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर मंदिरात जाऊन शंकरांची उपासना करावी. यावेळी त्यांना गंगाजल अर्पण करावं. खरं तर कोणत्याही प्रकारची उपासना, पूजा आणि भजनासाठी ठराविक वेळेची वाट पाहू नये. परंतु, चार्तुमासात अशी शुभ कार्य अवश्य करावी. यामुळे देवता प्रसन्न होतात. देवतांच्या कृपेमुळे आपलं जीवन सुखी होतं

भगवान महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे उपासना करा. असे मानले जाते की त्यांच्या भक्तांच्या उपासनेमुळे ते सहज प्रसन्न होतात. अशावेळेस महादेव यांना काय आवडते, त्यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या अर्पण करून तुम्हाला इच्छित वरदान मिळू शकते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया.

या 10 वस्तू अर्पण करून शिवाला प्रसन्न करा

पाणी – शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने आपला स्वभाव शांत होतो. आपले वर्तन प्रेमळ बनते.

दूध – शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आपल्याला चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळतात.

दही – भगवान महादेवांना दह्याने स्नान केल्याने स्वभावात गांभीर्य येते.

साखर – साखर अर्पण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी वाढते.

मध – देवाला मध अर्पण केल्याने आपल्या बोलण्यात गोडवा येतो.

तूप – शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने शक्ती वाढते.

सुगंधीत अत्तर – महादेवांना सुगंधीत अत्तर अर्पण केल्याने विचार शुद्ध होतात.

चंदन – शिवलिंगाला चंदन लावल्याने मान आणि प्रतिष्ठा वाढते.

भांग – महादेव यांना भांग खूप आवडते…. भांग अर्पण केल्याने सर्व वाईट आणि दुर्गुणांचा अंत होतो.

केशर – भगवान महादेवांना केशर अर्पण केल्याने सौम्यता येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!
ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी.
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप.
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?
चूक नेमकी कोणाची? त्या शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलण?.
VIDEO : शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी
VIDEO : शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी.
शिरसाट अन् गायकवाडांवर शिंदे नाराज, आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान
शिरसाट अन् गायकवाडांवर शिंदे नाराज, आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान.
जयंतराव आमच्याकडे या... प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच कोणाची ऑफर?
जयंतराव आमच्याकडे या... प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच कोणाची ऑफर?.
शिवरायांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळ, नेमका काय होणार फायदा?
शिवरायांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळ, नेमका काय होणार फायदा?.
त्यांच्या अब्रुचे रोजच धिंडवडे निघताय, त्यांना मान...शिरसाटांना डिवचलं
त्यांच्या अब्रुचे रोजच धिंडवडे निघताय, त्यांना मान...शिरसाटांना डिवचलं.