Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणानंतर कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी नक्की करा ‘या’ गोष्टी, अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल

कार्तिक पौर्णिमेला आलेले हे चंद्रग्रहण छाया चंद्रग्रहण असल्याने काळजी करण्याची गरज नाही, परंतु शुद्धीकरणासाठी काही उपाय करणे आवश्यक असल्याचे ज्योतिषांनी सांगितले.

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणानंतर कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी नक्की करा 'या' गोष्टी, अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल
चंद्रग्रहणानंतर कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी नक्की करा 'या' गोष्टी


Lunar Eclipse 2021 : कार्तिक पौर्णिमेची तिथी खूप खास असते. ज्योतिष शास्त्रानुसार ही तिथी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करते. तसेच तुमच्या जीवनात प्रकाश आणते. या तिथीला देव दिवाळी साजरी केली जाते. या तिथीबाबत अनेक उपाय सांगितले आहेत, जे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. कार्तिक पौर्णिमेला आलेले हे चंद्रग्रहण छाया चंद्रग्रहण असल्याने काळजी करण्याची गरज नाही, परंतु शुद्धीकरणासाठी काही उपाय करणे आवश्यक असल्याचे ज्योतिषांनी सांगितले.

हे काम नक्कीच करा

1. गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा, मीठ पाण्याने लादी पुसा.
2. संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करा. भगवान शंकराला जलाभिषेक करावा.
3. दिवाळीत ज्या प्रकारे स्वच्छतेची काळजी घेतो, त्याचप्रमाणे देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी स्वच्छता केली पाहिजे.
4. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर रांगोळी काढा. रांगोळी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. त्याचे वेगवेगळे रंग तुमच्या आयुष्यात आनंद आणतात.
5. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकू आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. या दिवशी देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावा.
7. पाण्यात हळद मिसळा आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा, असे केल्याने सुख-समृद्धी येईल.
8. संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करा, असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
9. माता लक्ष्मीला खीर अर्पण करा आणि भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करा.
10. संध्याकाळी गणपतीला हळद अर्पण करा. असे केल्याने लग्न न झालेल्यांच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील.
11. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचे किंवा तेलाचे मोठे दिवे लावा. (Lunar Eclipse 2021, after the lunar eclipse, on the eve of Kartik Pournima, do these things)

इतर बातम्या

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI