Magh Gupta Navratri 2024 : या तारखेपासून सुरू होणार माघ गुप्त नवरात्री, घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी

हिंदू दिनदर्शीकेनुसार, एका वर्षात चार नवरात्री साजरी केल्या जातात. ही नवरात्र चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात येते. माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र (Magh Gupta Navratri) म्हणतात.

Magh Gupta Navratri 2024 : या तारखेपासून सुरू होणार माघ गुप्त नवरात्री, घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी
नवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 9:23 AM

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या कालावधीत संपूर्ण 9 दिवस भक्त माता दुर्गेच्या 9 रूपांची खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात. मातेच्या आशीर्वादाचा महिमा इतका दिव्य आहे की ती आपल्या भक्तांचे प्रत्येक संकट आणि समस्या नाहीशी करते. हिंदू दिनदर्शीकेनुसार, एका वर्षात चार नवरात्री साजरी केल्या जातात. ही नवरात्र चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात येते. माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र (Magh Gupta Navratri) म्हणतात. यामध्ये 10 महाविद्येचे गुप्तपणे आचरण करून भाविक मातेचा आशीर्वाद घेतात. माघातील ही नवरात्र शक्ती उपासनेसाठी अतिशय शुभ मानली जाते. चला जाणून घेऊया माघ महिन्याची ही नवरात्र कधी सुरू होणार आहे, ती किती दिवस साजरी होणार आहे आणि त्याच्या पूजेसाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल.

माघ नवरात्र कधीपर्यंत

हिंदू कॅलेंडरनुसार, माघ गुप्त नवरात्री शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल आणि रविवार, 18 फेब्रुवारी 2024 रोजी समाप्त होईल. हे नवरात्र पूर्ण 9 दिवस साजरे केले जाईल. ज्यामध्ये देवीच्या 9 रूपांची गुप्तपणे पूजा केली जाते.

घटस्थापना शुभ मुहूर्त

माघ नवरात्री घटस्थापना दिवस – 10 फेब्रुवारी 2024, शनिवार

हे सुद्धा वाचा

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त – घटस्थापनेचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 8.45 ते 10.10 पर्यंत असेल. त्याचा एकूण कालावधी 1 तास 25 मिनिटे असेल. अभिजीत मुहूर्त- दुसऱ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त दुपारी 12.13 ते 12.58 पर्यंत असेल. त्याचा कालावधी एकूण 44 मिनिटांचा असेल.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना करताना दुर्गा देवीचे आवाहन केले जाते. याला घटस्थापना म्हणतात. गुप्त नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेसाठी या दोन शुभ मुहूर्त आहेत. घटस्थापना यापैकी कोणत्याही शुभ मुहूर्ताच्या अंतराने करता येते.

या देवीच्या दहा महाविद्या आहेत

गुप्त नवरात्रीत या दहा महाविद्यांची पूजा केली जाते. दहा महाविद्या देवी पुढीलप्रमाणे – काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरा भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी किंवा कमला. मातेच्या या 10 महाविद्यांचे पूजन केल्याने मनुष्याला विशेष सिद्धी प्राप्त होते आणि जीवनातील दु:ख दूर होतात असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.