AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी पुर्व दिशेला ठेवा ही लहानशी वस्तू, दुर होतील आर्थिक समस्या

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर..

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी पुर्व दिशेला ठेवा ही लहानशी वस्तू, दुर होतील आर्थिक समस्या
सुर्य देवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 12, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई, यावेळी 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण साजरा केला जाणार आहे.  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतात, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. हा सण विशेषतः सूर्यदेवासाठी साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही वास्तु टिप्स अंगीकारल्यास घरातील गरिबी दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते. या शुभ मुहूर्तावर केलेल्या कामामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते. असेही मानले जाते की या दिवशी व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की, जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा त्यांनी काळे तीळ सोबत नेले. ज्याने तो लवकरच खूश झाला.

या कारणास्तव या दिवशी काळ्या तिळाच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या सर्वांपैकी मकर संक्रांतीच्या दिवशी घरी काही विशीष्ट गोष्टी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू आणा

वास्तुशास्त्रात मकर संक्रांतीच्या दिवशी पितळेचा सूर्य घरात आणण्याचे महत्व सांगितले आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. या दिवशी घराच्या पूर्व दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. घराच्या तळाशी पितळी सूर्याची घंटा ठेवल्याने सकारात्मकता दुर होते आणि हे घरामध्ये शुभ चिन्ह मानले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी अशी पूजा करावी

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर या काळात पूजा केल्याने व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात. या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यात लाल फुले आणि अक्षत अर्पण केल्याने सूर्य देव प्रसन्न होतो. तसेच सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. इतकेच नाही तर या दिवशी तीळ, घोंगडी आणि अन्नदान करणे विशेष मानले जाते. दुसरीकडे करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना खिचडी खाऊ घालणे फायदेशीर ठरते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...