Margashirsh Mass 2021 | मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय ? कशी कराल आराधना, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या काळात हिंदू धर्मातील अनेक सण येतात या सणांची पूजा अर्चना अगदी मनोभावे केली जाते. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्यात आला आहे.

Margashirsh Mass 2021 | मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय ? कशी कराल आराधना, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
lord-visnu


मुंबई :  हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या काळात हिंदू धर्मातील अनेक सण येतात या सणांची पूजा अर्चना अगदी मनोभावे केली जाते. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्यात आला आहे. या काळात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व माहीत आहे का? चला तर मग
जाणून घेऊयात मार्गशीर्ष महीन्याचे महत्त्व आणि संपूर्ण महिन्याचे कॅलेंडर.

मार्गशीर्ष मास 2021 दिवससण आणि उपवास
21नोव्हेंबर शनिवारसंकष्टी गणेश चतुर्थी
23 नोव्हेंबर मंगळवारसंकष्टी गणेश चतुर्थी
27 नोव्हेंबर शनिवारमासिक कालाष्टमी, काळभैरव जयंती
30 नोव्हेंबर मंगळवारउत्तन एकादशी
2 डिसेंबर गुरुवारप्रदोष आणि मासिक शिवरात्री
4 डिसेंबर शनिवारसूर्यग्रहण, नवीन चंद्र तारीख
5 डिसेंबर रविवारमार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा, हेमंत ऋतु, चंद्रदर्शन
7 डिसेंबर मंगळवारमार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी, विनायक चतुर्थी
8 डिसेंबर बुधवारविवाह पंचमी
9 डिसेंबर गुरुवारस्कंद षष्ठी
11 डिसेंबर शनिवारमासिक दुर्गाष्टमी व्रत
14 डिसेंबर मंगळवारमोक्षदा एकादशी, गीता जयंती
15 डिसेंबर बुधवारमत्स्य द्वादशी
16 डिसेंबर गुरुवारअनंग त्रयोदशी व्रत, प्रदोष व्रत, धनु संक्रांती
18 डिसेंबर शनिवारसत्य व्रत, रोहिणी व्रत, पौर्णिमा व्रत, दत्तात्रेय जयंती
19डिसेंबर रविवारअन्नपूर्णा जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा, त्रिपुरा भैरवी जयंती

काय आहे या महिन्याचे महत्व, कशी कराल पूजा

मनातील ईच्छा पुर्ण करण्यासाठी भगवान विष्णुची पूजा नेहमीच फळदायी ठरते. असं म्हाणतात जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर घाबरून न जाता ओम दामोदराय नमः या मंत्राचा जप करावा आणि आपल्या गुरूला नमस्कार करावा, यामुळे समस्या दूर होतील. यासोबतच शंखाची पूजा केल्याने घरातील सर्व समस्य दूर होतात. याशिवाय पूजा करताना विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा. रोज पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. पुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यात शंखाची पूजा करावी. ज्याप्रमाणे सर्व देवतांची पूजा केली जाते, त्याच प्रकारे शंखाची पूजा केली पाहिजे.

संबंधित बातम्या :

Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…

PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI