Masik Shivratri 2021 : आज मासिक शिवरात्र, या शुभ दिनी अनेक विशेष संयोग, हे उपाय केल्याने सर्व त्रास दूर होतील

आज अश्विन महिन्याची मासिक शिवरात्री (Masik Shivratri) आहे. हा दिवस भगवान शिव यांना समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी मासिक शिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते. जे शिवलिंगाची पूर्ण भक्तीने पूजा करतात, महादेव त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

Masik Shivratri 2021 : आज मासिक शिवरात्र, या शुभ दिनी अनेक विशेष संयोग, हे उपाय केल्याने सर्व त्रास दूर होतील
Lord-Shiva
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 04, 2021 | 8:57 AM

मुंबई : आज अश्विन महिन्याची मासिक शिवरात्री (Masik Shivratri) आहे. हा दिवस भगवान शिव यांना समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी मासिक शिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते. जे शिवलिंगाची पूर्ण भक्तीने पूजा करतात, महादेव त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

ज्योतिषांच्या मते, मासिक शिवरात्रीच्या दिवशी विशेष उपाय केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतात. या उपायांबाबत जाणून घ्या –

1. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधीवत पूजा करा. यानंतर रुद्राक्षाच्या माळेसह 108 वेळा “ओम गौरी शंकर नम:” या मंत्राचा जप करा. जप केल्यानंतर गंगाजलने रुद्राक्ष शुद्ध करुन लाल धाग्यात घालून लग्नाची शुभवार्ता मिळेपर्यंत परिधान करा.

2. मासिक शिवरात्रीच्या दिवशी घरात भगवान शिव आणि देवी पार्वतीचे चित्र आणा आणि पूजा करा. यासोबतच रुद्राक्षाच्या माळेने “हे गौरी शंकर अर्धगिंनी यथा त्वं शंकर प्रिया और मास करु कल्याणी कान्त कान्ता सुदुर्लभम्” या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

3. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा, हा उपाय केल्याने आरोग्य सुधारण्यास सुरवात होईल.

4. शिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू भगवान शंकराला अर्पण कराव्यात. असे मानले जाते की या गोष्टी अर्पण केल्याने पैसे मिळवण्याची संधी मिळते.

5. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर शिवलिंग समोर बसून “ओम श्रीं वर प्रदाय श्री नम:” या मंत्राचा जप करा आणि वेळोवेळी भगवान शंकराला 5 नारळ अर्पण करा. उपाय केल्यास विवाहाशी संबंधित समस्या दूर होतात.

6. मासिक शिवरात्रीच्या दिवशी 21 बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ओम नमः शिवाय’ लिहून शंकराला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

मासिक शिवरात्रीचा शुभ मुहूर्त

यावेळी मासिक शिवरात्रीचा दिवस सोमवारी येत आहे. याशिवाय, या दिवशी कृष्ण पक्षाचे प्रदोष व्रतही आहे. सोमवारी पडल्यामुळे त्याला सोम प्रदोष व्रत असेही म्हणतात. अनेक शुभ मुहूर्त असल्यामुळे ही मासिक शिवरात्री अत्यंत फलदायी मानली जात आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी सोमवार 4 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 09:05 वाजता सुरू होईल. अश्विन महिन्याची चतुर्दशीची तिथी मंगळवारी 05 ऑक्टोबर रोजी रात्री 07:04 पर्यंत असेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Kanakdhara Stotra | जीवनात आर्थिक चणचण भासतेय, दर शुक्रवारी श्रीमहालक्ष्मीच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा

PHOTO | Navratri 2021 : नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेचे नऊ नियम, जे पूर्ण करतात 9 मोठ्या इच्छा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें