मौनी अमावस्या : ब्रह्म मुहू्र्तावर स्नानासाठी भाविकांची संगमावर गर्दी… पोलिसांचा कडक बंदोबस्त
मौनी अमावस्या : मौनी अमवस्या ही माघ महिन्यात येते... आज तो खास दिवस आहे. या दिवशी भाविक स्नान करण्यासाठी संगमावर गर्दी करतात. यासाठी प्रशासनाने व्यापक व्यवस्था केली आहे.

माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा माघ अमावस्या म्हणतात. यंदाच्या वर्षी 18 जानेवारी रोजी तो खास दिवस आहे. मौनी अमावस्येच्या ब्रह्म मुहूर्ताची सुरुवात झाल्यानंतर स्थान करण्यासाठी अनेक भविकांची गर्दी नद्यांच्या संगमावर पोहोचली. मौनी अमावस्येसाठी प्रशासनाने व्यापक व्यवस्था केली आहे. आज पवित्र स्नानाला 3 कोटींहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजेपर्यंत 1 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं.
प्रयागराज विभागाच्या विभागीय आयुक्त सौम्या अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनी अमावस्येला भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक देखील त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर भाविकांची वाढणारी गर्दी पाहाता NDRF, SDRF, पीएसी पथक तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एटीएस कमांडो आणि गुप्तचर संस्था तैनात करण्यात आल्या आहेत. संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंवरही लक्ष ठेवलं जात आहे.
जवळपास 4 कोटी भाविक येण्याची अपेक्षा
भक्तांना कोणत्यात प्रकारची असुविधा होऊ नये म्हणून पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तीन ते चार कोटी लोक येण्याची अपेक्षा आहे. आणि भक्तांची संख्या वाढल्यानंतर आकड्यांबद्दल देखील तुम्हाला सांगू.’, प्रयागराजचे जिल्हा दंडाधिकारी मनीष कुमार वर्मा म्हणाले, मौनी अमावस्येसाठी स्नान विधी आधीच सुरू झाले आहेत. लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने लोक आधीच पोहोचले आहेत.
1.5 कोटी लोकांनी केलं स्नान
प्रयागराज येथे होत असलेल्या माघ माळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या एक दिवस आधी शनिवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजेपर्यंत 1.5 कोटी लोकांनी गंगा आणि संगमात स्नान केलं आहे. ही माहिती देताना मेळा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी मौनी अमावस्येच्या मुख्य स्नान उत्सवासाठी भाविक सकाळपासूनच परिसरात येत आहेत. याआधी मकर संक्रांतीच्या दिवशी 1.3 कोटी लोकांनी स्नान केलं तर एकादशीच्या दिवशी सुमारे ८५ लाख लोकांनी गंगा आणि संगमात स्नान केलं.
