AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohini Ekadashi 2023 : आज मोहिनी एकादशीला जुळून येतोय शुभ योग, या उपायांनी होईल मोठा धनलाभ

या दिवशी भगवान विष्णूने समुद्रमंथनातून अमृताचे रक्षण केले आणि राक्षसांपासून वाचवून देवतांना दिले. यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला.

Mohini Ekadashi 2023 : आज मोहिनी एकादशीला जुळून येतोय शुभ योग, या उपायांनी होईल मोठा धनलाभ
मोहिनी एकादशीImage Credit source: Social Media
| Updated on: May 01, 2023 | 10:24 AM
Share

मुंबई : मोहिनी एकादशीचे (Mohini Ekadashi 2023) व्रत आज, सोमवार, 1 मेला आहे. एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि यापैकी काही एकादशींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मोहिनी एकादशी हादेखील असाच खास दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूने समुद्रमंथनातून अमृताचे रक्षण केले आणि राक्षसांपासून वाचवून देवतांना दिले. यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी रवियोग आणि ध्रुव योग असे शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे भगवान विष्णूची अपार कृपा होईल. यासोबतच सर्व संकटे आणि अडथळे दूर होतील.

एकादशीसाठी प्रभावी उपाय

  1.  आज मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची तसेच तुळशीजींची पूजा करा. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचे ५ दिवे लावावेत. तसेच तुळशीच्या 11, 21 परिक्रमा करा. यादरम्यान ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. नकारात्मकता निघून जाते. पण या काळात तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्श करू नका हे लक्षात ठेवा. कारण तुळशी एकादशीच्या दिवशीही उपवास करते आणि जल अर्पण करून तिचा उपवास तोडला जातो.
  2. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले पाणी अर्पण करावे. तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात.
  3. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. तसेच लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर विष्णुसहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील, ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होईल. नशिबाच्या मदतीने तुमची कामे मार्गी लागतील.
  4. लग्नात विलंब किंवा अडथळा येत असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. तसेच पिवळी फळे, पिवळी मिठाई दान करा. तसेच भगवान विष्णूंना केशरमिश्रित दुधाचा अभिषेक करावा.
  5. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळे शंख अर्पण करा, नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. पैसा झपाट्याने वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.