Nag Panchami 2021 | या मंदिरात स्वत: नागराज तक्षक निवास करतात, फक्त नाग पंचमीलाच उघडतात मंदिराचे द्वार

नागचंद्रेश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. असे म्हटले जाते की नागराज तक्षक स्वतः या मंदिरात निवास करतात. मात्र, कोरोनामुळे या वर्षी भाविकांना भगवान नागचंद्रेश्वराचे दर्शन घेता येणार नाही. यंदा भाविकांसाठी थेट ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Nag Panchami 2021 | या मंदिरात स्वत: नागराज तक्षक निवास करतात, फक्त नाग पंचमीलाच उघडतात मंदिराचे द्वार
Nagraj Takshak Temple

मुंबई : सनातन धर्मात नागांना पूजनीय मानले जाते. जिथे वासुकी नाग हे भगवान शिवाच्या गळ्याचे अलंकार आहे, तिथे भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात. ज्याप्रमाणे सर्व देवतांच्या पूजेसाठी सर्व विशेष दिवस बनवले गेले आहेत, त्याचप्रमाणे नागांच्या पूजेसाठी नाग पंचमीचा दिवस देखील आहे. नाग पंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, यावेळी नाग पंचमी आज शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे.

नाग पंचमीच्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाग देवतेच्या एका अशा मंदिराबद्दल ज्यांचे दरवाजे संपूर्ण वर्षात फक्त नाग पंचमीच्या दिवशीच 24 तास उघडतात. हे मंदिर आहे मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये. नागचंद्रेश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. असे म्हटले जाते की नागराज तक्षक स्वतः या मंदिरात निवास करतात. मात्र, कोरोनामुळे या वर्षी भाविकांना भगवान नागचंद्रेश्वराचे दर्शन घेता येणार नाही. यंदा भाविकांसाठी थेट ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे मंदिर महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या खंडावर स्थित आहे –

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर मंदिर देशभरात ओळखले जाते. हे मंदिर तीन विभागांमध्ये विभागलेले आहे. तळाशी भगवान महाकालेश्वराचे मंदिर आहे, दुसऱ्या विभागात ओंकारेश्वर आणि तिसऱ्या विभागात भगवान नागचंद्रेश्वर आहे. या मंदिरात अकराव्या शतकातील एक आश्चर्यकारक मूर्ती आहे. ज्यामध्ये फना काढलेल्या नागाच्या आसनावर शिव-पार्वती विराजमान आहेत. ही मूर्ती नेपाळमधून आणल्याचे सांगितले जाते.

जगात कुठेही या मंदिरासारखी मूर्ती नाही

सहसा भगवान विष्णूला सर्पाच्या आसनावर बसलेले दाखवले जाते. परंतु येथे भोलेनाथ, भगवान गणेश आणि माता पार्वतीसह दहा मुखाच्या सापाच्या आसनावर विराजमान आहेत आणि भुजांभोवती भुजंग गुंडाळलेले आहेत. असे म्हटले जाते की, संपूर्ण जगात इतर कोणत्याही मंदिरात नागचंद्रेश्वर मंदिरासारखी मूर्ती नाही.

नागराज तक्षकबाबत मान्यता काय?

मान्यता आहे की, एकदा नागराज तक्षकने शिवशंकराची घोर तपश्चर्या करुन त्यांना प्रसन्न केले. यानंतर महादेवाने तक्षकराजला अमर होण्याचे वरदान दिले. महादेवांकडून हे वरदान मिळाल्यानंतर, तक्षक परमेश्वराच्या सहवासात राहू लागले. त्यांनी महाकालचे स्थान याकरिता निवडले जेणेकरुन तो एकांतात राहू शकेल आणि त्या ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही.

मान्यता आहे की, नाग पंचमीच्या दिवशीच सर्वांना सर्पराजांचे दर्शन मिळते. उर्वरित वेळ त्याच्या सन्मानासाठी मंदिर बंद ठेवले जाते. असे मानले जाते की जो कोणी या मंदिरात नाग पंचमीच्या दिवशी दर्शनासाठी येतो, तो कोणत्याही प्रकारच्या सर्पदोषांपासून मुक्त होतो. म्हणूनच दरवर्षी नाग पंचमीच्या दिवशी ये मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Nag Panchami 2021 | आज नाग पंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Nag Panchami 2021 | नाग पंचमी कधी? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि इच्छापूर्तीसाठी काय उपाय करावे?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI