Nag Panchami 2022 : हिंदू धर्मात (Hindu Religion) नागाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात अनेक जीवांची देवाच्या रूपात पूजा (Worship as God) केली जाते. साप हा देखील असाच एक प्राणी आहे, ज्यावर भारतातील लोकांची गाढ श्रद्धा आहे. नागपंचमीला नागांची विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नागदेवतांची मंदिरेही बांधण्यात आली आहेत. सनातन परंपरेशी संबंधित सर्व पौराणिक कथांमध्ये नागपंचमी महापर्व दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग जातीशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन त्यांची विधिवत पूजा केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष (Kalsarpa Dosha) आणि सर्पदंशाची भीती दूर होते. आपल्या देशात अनेक प्रसिद्ध नाग मंदिरे (Famous snake temples) आहेत. जिथे देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होते. दरम्यान, आपल्या देशात अशीही काही नाग मंदिरे आहेत, जिथे दर्शन केल्याने, भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.