AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaitra Navratri 2022 | नवरात्रीच्या उपवासात हायड्रेट राहण्यासाठी या पेयांचा उपयोग आणि तंदुरुस्त राहा

2 एप्रिलपासून ( 2 April) चैत्र नवरात्री (Navratri) सुरू झाली आहे. नवरात्रीत लोक 9 दिवस उपवास करतात. अशा परिस्थितीत बहुतेक लोक फळांचे सेवन करतात, तर काही लोक असे आहेत जे फळे सोडून फक्त पाणी, लिंबूपाणी किंवा सरबत घेऊन उपवास करतात.

Chaitra Navratri 2022 | नवरात्रीच्या उपवासात हायड्रेट राहण्यासाठी या पेयांचा उपयोग आणि तंदुरुस्त राहा
Navratri
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 05, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : 2 एप्रिलपासून ( 2 April) चैत्र नवरात्री (Navratri) सुरू झाली आहे. नवरात्रीत लोक 9 दिवस उपवास करतात. अशा परिस्थितीत बहुतेक लोक फळांचे सेवन करतात, तर काही लोक असे आहेत जे फळे सोडून फक्त पाणी, लिंबूपाणी किंवा सरबत घेऊन उपवास करतात. अशा स्थितीत त्या लोकांच्या शरीरात पोषक द्रव्ये पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. या दिवसांमध्ये जर तुम्ही उपवास (Fast) करताना लिक्विड डाएटला प्राधान्य देत असाल आणि अन्नापासून दूर राहता, म्हणूनच या दिवसात तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिणे गरजेचे आहे जेणेकरून शरीर अशक्त होऊ नये. चला जाणून घेऊया अशाच पेयांबद्दल जे उपवासातही तुम्हाला तंदुरुस्त ठेवतील.

नारळ पाणी

नारळपाणी केवळ उपवासातच नाही तर दैनंदिन जीवनातही पाण्याची कमतरता पूर्ण करते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसोबतच त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे अनेक घटक आढळतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे देखील मिळतात. एका नारळपाण्यांमध्ये एका सलाईन इतकी ताकद असते असे मानतात.

बनाना शेक

उपवासाच्या दिवसात तुम्ही बनाना शेक देखील पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषण तर मिळेलच पण पोटही भरेल. हा एक निरोगी शेक आहे जो तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवेल. केळ खाल्यांने बराच वेळ भुक लागत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराल एनर्जी मिळते.

सफरचंद रस

नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सफरचंदाचा रस देखील पिऊ शकता. हे तुम्हाला भरपूर ऊर्जा देण्याचे काम करेल. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

लिंबूपाणी

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अनेक खनिजे आढळतात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्ही लिंबू पाण्यात किंवा सरबत म्हणूनही वापरू शकता. उपवासात तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच ऊर्जा देण्याचेही काम करेल.

ताक

बाहेरच्या उन्हाने अंगाची लाही होत असताना या दिवसात ताक तुम्हाला थंडावा देईल. उपवासात ताकही सेवन करता येते. यामध्ये कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी6 आणि प्रोटीनसारखे पोषक घटक असतात. जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी किंवा डॉक्टरांशी  संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली