AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : बेडरूममध्ये ठेवलेल्या या वस्तुंमुळे उडेल झोप, मनावर येतो प्रचंड तणाव, तुम्ही देखील करता का ही चूक?

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील बेडरूम हे एक महत्त्वाचं स्थान आहे. कारण तुम्ही जेव्हा दिवसभर काम करून प्रचंड थकलेले असतात. तेव्हा अशावेळी विश्रांती घेण्याचं ते एक तुमच्या हक्काचं स्थान आहे. मात्र बेडरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू या तुमच्या विश्रांतीमध्ये बाधा ठरू शकतात. यामुळे तुमचं मन शांत होण्याऐवजी अधीकच तणावग्रस्त होईल.

Vastushastra : बेडरूममध्ये ठेवलेल्या या वस्तुंमुळे उडेल झोप, मनावर येतो प्रचंड तणाव, तुम्ही देखील करता का ही चूक?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 9:34 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार तुमची बेडरूम ही तुमच्या घरात असलेली एक महत्त्वाची जागा आहे. कारण तुम्ही दिवसभर प्रचंड काम केलेलं असतं. कामामुळे तुम्ही थकलेले असतात. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. अशा स्थितीमध्ये तुमची बेडरूम ही तुमच्या विश्रांतीसाठी हक्काची जागा असते. जर तुमच्या बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला तिथे प्रसन्न वाटतं, मनावरील ताण हलका होतो आणि शांत झोप देखील लागते, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच ऊर्जेने पुन्हा काम करण्यासाठी तयार होतात. मात्र अनेकदा असं देखील होतं की काही चुकांमुळे बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते.

जेव्हा तुमच्या बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्यावेळी त्याचा उलट प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतो. जर तुमच्या बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला कधीही शांत झोप लागत नाही. काहीही कारण नसताना तुमच्या मनावर तणाव येतो. वातावरणात जडपणा येतो, त्यामुळे तुम्हाला बेडरूममध्ये अस्वस्थ वाटू लागतं. तुमच्या विश्रांतीमध्ये बाधा निर्माण होते. हे असं का होतं? यामागे नेमकी काय कारणं आहेत? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार अग्नी तत्वाशी संबंधित वस्तू या कधीही बेडरूममध्ये ठेवू नये, जसं की गॅस, सिलिंडर, शेगडी या सारख्या वस्तू कधीही बेडरूममध्ये ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. एवढंच नाही तर फ्रीज, टीव्ही या सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील बेडरूममध्ये ठेवू नये, यामुळे तुमच्या मनावर ताण निर्माण होतो. वातावरण जड वाटतं, तसेच तुमच्या झोपेमध्ये देखील वारंवार व्यत्यय येतो. त्यामुळे अशा वस्तू या बेडरूममध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. तसेच राधा कृष्ण यांच्या फोटो व्यतिरिक्त इतर देवतांचे फोटो देखील शक्यतो बेडरूममध्ये लावू नये, या देवतांचे फोटो हॉल किंवा स्वयंपाक घरात लावावेत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...