AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व

आज निर्जला एकादशी आहे (Nirjala Ekadashi 2021). हिंदू दिनदर्शिकेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि निर्जला एकादशीचे व्रत हे सर्व एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते.

Nirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व
Lord Vishnu Image
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : आज निर्जला एकादशी आहे (Nirjala Ekadashi 2021). हिंदू दिनदर्शिकेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि निर्जला एकादशीचे व्रत हे सर्व एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. निर्जला एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि नियमांसंबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या (Nirjala Ekadashi 2021 Vrat Know The Shubh Muhurat Importance ANd Rules) –

शुभ मुहूर्त –

एकादशीची तिथी 20 जून रोजी दुपारी 04 वाजून 21 मिनिटांनी सुरु होईल आणि 21 जून रोजी दुपारी 01 वाजून 31 मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार, 21 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत ठेवले जाईल आणि 22 जून रोजी उपवास सोडतील.

या उपवासाचे नियम काय?

मान्यता आहे की हे व्रत पाळणे फार कठीण आहे. कारण हे व्रत पाळणारे पाण्याचे थेंबसुद्धा घेत नाही. या निर्जला एकादशीला उपवास करण्याच्या एक दिवस आधी भाताचा त्याग करावा. असे म्हणतात की, हे व्रत पाळणाऱ्याने व्यक्तीने सात्विक आहार घ्यावा.

या उपवासाचे महत्त्व

शास्त्रानुसार, प्रत्येकाने निर्जला एकादशीचे व्रत आपल्या जीवनात ठेवावे. या व्रताला निर्जला एकादशी असे म्हणतात. त्याशिवाय याला पांडव एकादशी देखील म्हणतात. याबद्दल एक आख्यायिका देखील आहे. मान्यता आहे की, महाभारत काळात भीमसेन यांनी हे व्रत पाळले होते, ज्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्त झाले. या व्यतिरिक्त असेही मानले जाते की जी व्यक्ती या व्रताचे पालन करतो त्याला मोक्ष मिळतो. तसेच, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्रताला भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते.

या व्रताचे फळ वर्षभर मिळते

मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत ठेवल्यास संपूर्ण वर्षभर एकादशीचे फळ मिळते. हिंदी दिनदर्शिकेनुसार एकादशी महिन्यातून दोनदा येते आणि अशा प्रकारे एकादशी संपूर्ण वर्षात 24 वेळा येते.

Nirjala Ekadashi 2021 Vrat Know The Shubh Muhurat Importance ANd Rules

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…

Mahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.