चमत्कारच! कुंभमेळ्यात डुबकी मारताच वृद्धाला मिळाली अशी वस्तू; लोकांना डोळ्यावर विश्वासच बसाना, पाहाण्यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे, त्यामुळे देशभरात सध्या भक्तिचा महासागर उसळला आहे. महाकुंभाच्या काळात पवित्र स्नान करण्यासाठी लोक देशभरातून प्रयागराजमध्ये येत आहेत.

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे, त्यामुळे देशभरात सध्या भक्तिचा महासागर उसळला आहे. महाकुंभाच्या काळात पवित्र स्नान करण्यासाठी लोक देशभरातून प्रयागराजमध्ये येत आहेत. तब्बल 144 वर्षांनंतर येणारा हा महाकुंभ मेळावा असल्यामुळे प्रयागराजमध्ये प्रचंड जनसागर उसळला आहे. रेल्वेसह प्रयागराजमध्ये येणाऱ्या बसेसला देखील प्रचंड गर्दी आहे. तर खासगी वाहनांमुळे ट्राफिक जाम झाली आहे. मात्र तरी देखील भाविक प्रयागराजला येतच आहेत.
दरम्यान आपन जेव्हा स्नानासाठी गंगेत डुबकी मारली तेव्हा, आपल्यासोबत एक विचित्र घटना घडल्याचा दावा एका वृ्द्ध व्यक्तीनं केला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीकडून हा दावा करण्यात आला आहे. जेव्हा आपण स्नानासाठी गंगेत उतरलो तेव्हा एक गोष्ट माझ्या हाती लागली. त्यामुळे मला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. मला एक कासव मिळालं. ज्याच्या शरीरावर इंग्रजी अक्षरं लिहीलेले होते. मी ते कासव आपल्या घरी आणलं आहे, आता ते कासव पाहाण्यासाठी लोक माझ्या घरी रांग लावत असल्याचं या वृद्धानं म्हटलं आहे.
कासवाच्या शरीरावर काय लिहीलं होतं?
या वृद्धानं असा दावा केला आहे की काही दिवसांपूर्वी ते प्रयागराजला गेले होते. यावेळी स्नान करताना त्यांना त्यांच्या पायाजवळ काहीतरी हालचाल जाणवली. जेव्हा त्यांनी पाण्यात हात घालून पाहिलं तेव्हा त्यांच्या हाताला एक कासव लागलं, या कासवाला पाहून मला प्रचंड धक्का बसला असं या वृद्धानं म्हटलं आहे, कारण या कासवाच्या शरीरावर इंग्रजी मुळाअक्षर एबीसीडी लिहिलेले होते. त्यानंतर मी या कासवाला बाहेर काढलं आणि माझ्यासोबत घेऊन आलो असा दावा या वृद्ध व्यक्तीनं केला आहे.
एकीकडे या वृद्ध व्यक्तीकडून कासवाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे, तर दुसरीकडे काही लोकांनी वृद्धाचा हा दावा म्हणजे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे.कासवाच्या अंगावर काही तरी पिवळ्या कलरच्या खुणा दिसत आहेत, मात्र तो एक पॅटर्न आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. हा पॅटर्न अलफाबेट सारखा दिसत असल्याचा दावा या लोकांनी केला आहे. मात्र हा कासव बघण्यासाठी आता या वृद्धाच्या घरी लोकांची लाईन लागली आहे.