AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur wari 2022: आज फलटणमध्ये विसावणार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी

टाळ मृदूंगाच्या नादात वैष्णवांची वारी पंढरपूरच्या (Pandhapur wari 2022) दिशेने पाऊलं टाकत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा  (Dnyaneshwar maharaj palkhi) आज फलटण  येथे  मुक्कामी असणार आहे. फलटण (Phaltan) येथे माऊलीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत सोहळा न झाल्याने फलटणवासीयांना माऊलीच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती. स्थानिकांनी रांगेत पालखीचे दर्शन घेतले.  तरडगाव […]

Pandharpur wari 2022: आज फलटणमध्ये विसावणार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी
| Updated on: Jul 01, 2022 | 7:55 PM
Share

टाळ मृदूंगाच्या नादात वैष्णवांची वारी पंढरपूरच्या (Pandhapur wari 2022) दिशेने पाऊलं टाकत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा  (Dnyaneshwar maharaj palkhi) आज फलटण  येथे  मुक्कामी असणार आहे. फलटण (Phaltan) येथे माऊलीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत सोहळा न झाल्याने फलटणवासीयांना माऊलीच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती. स्थानिकांनी रांगेत पालखीचे दर्शन घेतले.  तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावचे स्वागत स्वीकारून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्‍तांसोबत संध्याकाळी चारला जिंती नाक्यावर फलटण शहरात दाखल झाला. येथे नागरिकांनी गर्दी केली होती.

वारीत दिला अवयव दानाचा संदेश

अहमदनगरला पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र डोंगरगण येथील रामेश्‍वर देवस्थान दिंडीच्या माध्यमातून अवयवदान, नेत्रदानाबाबत जनजागृती केली गेली. या दिंडीचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात स्वागत करण्यात आले. दिंडीतील वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी प्राथमिक औषधोपचाराची किट फाउंडेशनच्या वतीने भेट देऊन अवयवदान आणि नेत्रदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी काही वारकर्‍यांनी मरणोत्तर अवयवदान आणि नेत्रदानाचा संकल्प देखील केला. गेल्या 18 वर्षांपासून फिनिक्स फाउंडेशन ही सेवाभावी संस्था या दिंडीची सेवा करते सोबतच वारकऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.