पतंजली विद्यापीठात फुलांची होळी, रामदेव बाबांसह भक्तांनी लुटला आनंद
पतंजली विद्यापीठात साजरा झालेल्या होळी उत्सवात स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची उपस्थिती होती. होळी हा केवळ रंग आणि जल्लोष नाही तर सामाजिक समरसतेचे प्रतिक असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. आचार्य बालकृष्ण यांनी होळी हा अहंकाराचा त्याग आणि एकात्मतेचा उत्सव असल्याचे म्हटले.

हरिद्वार : होळीच्या पावन पर्वावर पतंजली विद्यापीठाच्या मैदानात होलिकोत्सव चांगलाच रंगला. पतंजली विद्यापीठाचे कुलाधीपती स्वामी रामदेव तसेच कुलपती आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थित हा सोहळा रंगला. यावेळी होलिकोत्सव यज्ञ आणि फुलांच्या होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक ऋषींनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रामदेव बाबांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला. होळी केवळ रंग आणि जल्लोषाचं पर्व नाहीये, तर सामाजिक समरसता, प्रेम, बंधुभाव आणि वाईटावर चांगल्या वृत्तीने मात करण्याचं प्रतिक आहे. आमच्या आत आत्मग्लानी, आत्मविस्मृती, आत्मसंमोहलन येऊ नये याची आज आपण शपथ घेतली पाहिजे. आपण सदैव सत्याच्या मार्गावर, सनातन पथावर, वेद पथावर, ऋषि पथावर आणि सात्विकतेच्या पथावर मार्गक्रमण करत राहूया. सनातन संस्कृतीतील प्रत्येक उत्सव आम्ही योग आणि यज्ञाच्या माध्यमातून साजरा करतो. योग आणि यज्ञ ही आमच्या सनातन संस्कृतीची आत्मतत्त्व आहेत. स्वामी जी यांनी सर्व देशवासीयांना आवाहन केले की, या सौहार्दाच्या वातावरणाला भांग आणि मद्याच्या नशेत बिघडू देऊ नका, कारण ते समाजासाठी हानिकारक आहे.

swami ramdev
या प्रसंगी आचार्य बालकृष्ण जी यांनी सांगितले की, होळी ही अहंकाराच्या त्योमाचा उत्सव आहे. आपल्या आतल्या विकारांना होलिकेच्या अग्नीमध्ये जाळण्याचा उत्सव आहे. होळीच्या दिवशी आपले सर्व मतभेद विसरून, एकात्मतेच्या रंगात रंगून या पवित्र उत्सवाला अर्थपूर्ण बनवा. त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की होळी हा उत्सव पूर्ण सात्विकतेसह साजरा करा. होळीच्या दिवशी गोबर, कीचड आणि रासायनिक रंगांचा वापर टाळा. फुलांचा आणि हर्बल गुलालाचा वापर करा. आचार्य जींनी सांगितले की, रासायनिक रंगांमुळे डोळे आणि त्वचा संबंधित रोग होऊ शकतात.

swami ramdev
आचार्य जींनी होळी खेळण्यापूर्वी काही काळजी घेण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की, होळी खेळण्यापूर्वी आपल्या शरीरावर राई किंवा नारळ तेल किंवा कोल्ड क्रीम लावा, यामुळे रासायनिक रंगामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
कार्यक्रमात पतंजली विश्वविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पतंजली संस्थानशी संबंधित सर्व ईकाई प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, संन्यासी बंधू आणि साध्वी बहिणी उपस्थित होत्या.