AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे हे कसे ओळखाल? तो दूर करण्यासाठी उपाय काय?

पितृदोष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दोष आहे जो पूर्वजांच्या अशुभ कर्मामुळे येतो. कुंडलीत सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि राहूच्या विशिष्ट स्थितीमुळे पितृदोष निर्माण होतो. या दोषामुळे आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या आणि कौटुंबिक वाद निर्माण होतात.

तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे हे कसे ओळखाल? तो दूर करण्यासाठी उपाय काय?
pitrudoshImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 18, 2025 | 11:22 PM
Share

हिंदू धर्मातील शास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या पुढील पिढीला भोगावी लागतात, यालाच पितृदोष असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात, त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. आता हा दोष कसा ओळखायचा, तो का होतो आणि ते दूर करण्यासाठी उपाय काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली त्याच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीची कुंडली ज्योतिषाला दाखवून, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांबद्दल माहिती मिळवता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग असतात. कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे त्या व्यक्तीचे जीवन आनंदी होते. त्यांना पैशाची आणि अन्नाची कमतरता नाही. तसेच या व्यक्तींना थोड्याशा कष्टाने यश मिळते. पण जर कुंडलीत अशुभ योग असेल तर मात्र त्या व्यक्तीला जीवनात असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते.

आज आम्ही तुम्हाला कुंडलीतील पितृ दोषाबद्दल सांगणार आहोत. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो. त्यांना पैशाचे नुकसान, आजारपण, कौटुंबिक अडचणी आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

कुंडलीत पितृदोष कसा आढळतो?

जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनी एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजे पाचव्या घरात असतो, तेव्हा पितृदोष येतो. याशिवाय, आठव्या घरात गुरु आणि राहू एकत्र असेल तरीही पितृदोष निर्माण होतो. जन्मकुंडलीत राहू मध्यभागी किंवा त्रिकोणात असेल तरी पितृदोष असल्याचे मानले जाते. तसेच, जर सूर्य, चंद्र आणि लग्नेश यांचा राहूशी संबंध असेल तर त्या व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो.

पितृदोष कसा दूर कराल?

  • वडाच्या झाडाखाली नियमितपणे दिवा लावावा.
  • तीळ मिसळलेले पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करावे.
  • नेहमी गायत्री मंत्राचा जप करावा.
  • पूर्वजांना नैवेद्य दाखवावा.
  • जर पूर्वज आनंदी असतील तर व्यक्ती पापांपासून मुक्त होते.
  • गरीब आणि गरजूंना मदत करावी.
  • नवरात्रीत कालिका स्तोत्राचा जप करावा.
  • प्रत्येक अमावास्येला ब्राह्मणांना भोजन द्यावे.
  • अमावस्येला कपडे आणि अन्नदान करावे.
  • मुंग्या, कुत्रे, गायी आणि पक्ष्यांना खायला द्यावे.
  • भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पूर्वजांच्या पुण्यतिथीला पिंडदान करावे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.