Pitru Paksha 2021 : पितृ पक्षाला सुरुवात, जाणून घ्या वास्तुनुसार श्राद्धाचे नियम

हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्वाचे मानले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्षाची सुरुवात दरवर्षी भाद्रपद महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी होते. यावेळी श्राद्ध पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे, जो 06 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरु राहील. या 15 दिवस कोणतेही शुभ कार्य करु नये. पितृ पक्षात पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा करावी.

Pitru Paksha 2021 : पितृ पक्षाला सुरुवात, जाणून घ्या वास्तुनुसार श्राद्धाचे नियम
pitru-paksha

मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्वाचे मानले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्षाची सुरुवात दरवर्षी भाद्रपद महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी होते. यावेळी श्राद्ध पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे, जो 06 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरु राहील. या 15 दिवस कोणतेही शुभ कार्य करु नये. पितृ पक्षात पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा करावी.

असे मानले जाते की या दिवसांमध्ये यमराज मृत जीवांना देखील मुक्त करतो जेणेकरुन त्याच्या नातेवाईकांकडून तर्पण घेऊन ते कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृपक्षात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वास्तूच्या नियमांचे पालन केले पाहिजे. पितृपक्षात पूर्वजांची पूजा केल्यानंतर दान-दक्षिणा द्यावी आणि ब्राह्मणांना अन्न द्यावे. वास्तूनुसार, पूर्वजांची पूजा करताना कोणते नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊया.

शास्त्रानुसार, पितृलोकाची स्थिती चंद्राच्या वर दक्षिण दिशेला मानली जाते. वास्तुनुसार, पूर्वजांची दिशा दक्षिण मानली जाते. असे मानले जाते की पूर्वजांचे आगमन दक्षिण दिशेने होते. पूर्वज नेहमी दक्षिणेकडून येतात. म्हणून, या दिशेने पूर्वजांची पूजा आणि तर्पण केले जाते. वास्तुनुसार, ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्ध केले जाते त्यादिवशी सूर्योदयापासून ते 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करावे.

वास्तुनुसार, पितृपूजेदरम्यान स्वच्छता असावी. याशिवाय, पूजेच्या भिंतींवर लाल, पिवळा, जांभळा असे आध्यात्मिक रंग असतील तर ते अधिक चांगले आहे. असे मानले जाते की, हे रंग आध्यात्मिक स्तरावर ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. त्याचवेळी काळ्या, निळ्या आणि राखाडी भिंती नसाव्यात. श्राद्धात दूध, गंगाजल, मध, कपडे, तीळ अनिवार्य आहे. यासर्व गोष्टी मिसळून पिंड दान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

पूर्वजांची दिशा दक्षिणेची मानली जाते, म्हणून तपर्ण करताना कर्ताचा चेहरा दक्षिणेकडेच असावा. तापर्णाच्या काळात अग्निची पूजा दक्षिण-पूर्व दिशेला करावी. असे मानले जाते की ही दिशा पुढे जाण्याचे प्रतिनिधित्व करते. वास्तूनुसार, त्या दिशेने अग्नीशी संबंधित कार्य केल्याने शत्रूंवर विजय मिळतो. या दिशेने पूजा केल्यास रोग आणि त्रास दूर होतात आणि घरात सुख आणि समृद्धी राहते. याशिवाय, श्राद्धाचे जेवण देताना ब्राह्मणांचा चेहरा दक्षिणेकडे असावा. असे केल्याने पित्र प्रसन्न होतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Pitru Paksha 2021 : या साध्या उपायाने दूर होईल पितृ दोष आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल

Pitru Paksha 2021 : आजपासून पितृ पक्षाला सुरुवात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI