Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात शुभ कार्य का केले जात नाही, जाणून घ्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 18, 2021 | 12:40 PM

पितृ पक्ष 2021 (Pitru Paksha 2021) सोमवार 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत सुरु राहतो. संपूर्ण 15 दिवसांचा हा श्राद्ध पक्ष आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. यावेळी पितृ पक्ष बुधवार, 6 ऑक्टोबरपर्यंत असेल.

Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात शुभ कार्य का केले जात नाही, जाणून घ्या
pitru-paksha

Follow us on

मुंबई : पितृ पक्ष 2021 (Pitru Paksha 2021) सोमवार 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत सुरु राहतो. संपूर्ण 15 दिवसांचा हा श्राद्ध पक्ष आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. यावेळी पितृ पक्ष बुधवार, 6 ऑक्टोबरपर्यंत असेल.

असे म्हटले जाते की, पितृपक्षाच्या वेळी मुंडण, साखरपुडा, लग्न, घर खरेदी इत्यादी कोणतेही शुभ कार्य करु नये. साखरपुडा आणि लग्नासारख्या गोष्टींविषयी बोलणेही टाळले जाते. बहुतेक लोकांना हे का केले जाते याचे कारण माहित नाही. ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रांकडून त्याबद्दल जाणून घेऊ –

पितृ पक्षात शुभ कार्य का करु नये?

आपले पूर्वज आदरणीय असतात. असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या वेळी ते आपल्यामध्ये येतात. अशात हे 15 दिवस त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याशी आध्यात्मिकरित्या जुळण्यासाठी असतात. अशा परिस्थितीत आपल्या सवयी, छंद आणि शुभ कार्यावर मर्यादा घालून त्यांच्याबद्दल आपला आदर आणि समर्पण दिसून येते. जेणेकरुन पूर्वजांना कळू शकेल की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजूनही त्यांची उणीव जाणवते. असे मानले जाते की, आपल्याप्रति आपल्या मुलांचे प्रेम पाहून पितर त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात.

तर्पण का केले जाते?

असे म्हटले जाते की, या 15 दिवसांमध्ये पितृलोकात पाण्याची कमतरता असते. अशा परिस्थितीत आपले पूर्वज पृथ्वीवरील आपल्या प्रियजनांच्या सानिध्यात येतात. जेव्हा त्यांचे वंशज तर्पण करतात तेव्हा पूर्वज समाधानी होतात आणि त्यांना शांती मिळते. अशा परिस्थितीत कुटुंबात सुख आणि समृद्धी टिकून राहते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | तुमच्या या सवयी ठरु शकतात वास्तुदोषाचे कारण, आर्थिक समस्याही उद्भवू शकते

Anant Chaturdashi 2021 | अनंत चतुर्दशीला 14 गाठींचा धागा का परिधान केला जातो, जाणून घ्या याची विधी आणि महत्त्व

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI