AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha : पितृ पक्षातले सप्तमी श्राद्ध आज, जाणून घ्या तर्पण विधी आणि महत्त्व

सप्तमीच्या श्राद्धात सात ब्राह्मणांना अन्नदान केले जाते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी कुशाच्या आसनावर बसून पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्री हरी भगवान विष्णूच्या परम स्वरूपाची पूजा केली जाते. यानंतर भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण केले जाते.

Pitru Paksha : पितृ पक्षातले सप्तमी श्राद्ध आज, जाणून घ्या तर्पण विधी आणि महत्त्व
पितृपक्षImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : आज पितृ पक्षातील (Pitru Paksha 2023) सप्तमी तिथी आहे, त्यामुळे आज सप्तमी श्राद्ध केले जाईल. सप्तमी श्राद्धात, सप्तमी तिथीला मृत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो. एका पौराणिक मान्यता आहे की या काळात पूर्वज आपल्या कुटूंबीयांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. यामुळेच पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी, पिंड दान आणि तर्पण केले जातात.  पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सप्तमी श्राद्धाचे विधी 1030142,973003,970570,969798कसे केले जातात आणि श्राद्ध करण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.

सप्तमी श्राद्धाची पद्धत

सप्तमीच्या श्राद्धात सात ब्राह्मणांना अन्नदान केले जाते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी कुशाच्या आसनावर बसून पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्री हरी भगवान विष्णूच्या परम स्वरूपाची पूजा केली जाते. यानंतर भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण केले जाते. पितरांच्या शांतीसाठी विशेष पितृ मंत्राचाही जप करावा.

सप्तमीचे श्राद्ध करण्यासाठी हातात कुश, जव, गंगाजल, दूध, काळे तीळ आणि अक्षत घेऊन संकल्प करा. मग “ओम आद्य श्रुतिस्मृति पुरानोक्त सर्व ऐहिक सुख आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आणि संतती वाढवण्यासाठी, देवऋषिमानुष्यपितृतर्पणं च अहं करिष्ये.” या मंत्राचा जप करा. सात ब्राह्मणांना जेवू घाला. मग त्यांना तुमच्या क्षमतेनुसार दान द्या.

सप्तमी श्राद्ध मुहूर्त

कुतुप मुहूर्त – सकाळी 10.51 ते 11.42 पर्यंत रोहीन मुहूर्त- सकाळी 11:42 ते दुपारी 12:31 पर्यंत दुपारची वेळ- दुपारी 12:31 ते 02:59 पर्यंत

आगामी श्राद्ध तारखा

06 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- अष्टमी श्राद्ध 07 ऑक्टोबर 2023, शनिवार- नवमी श्राद्ध 08 ऑक्टोबर 2023, रविवार- दशमी श्राद्ध 09 ऑक्टोबर 2023, सोमवार- एकादशी श्राद्ध 10 ऑक्टोबर 2023, मंगळवार- माघ श्राद्ध 11 ऑक्टोबर 2023, बुधवार- द्वादशी श्राद्ध 12 ऑक्टोबर 2023, गुरुवार- त्रयोदशी श्राद्ध 13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- चतुर्दशी श्राद्ध 14 ऑक्टोबर 2023, शनिवार- सर्व पितृ अमावस्या

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.