Pitrupaksh 2023 : पितृपक्षात अवश्य करा दिव्याशी संबंधीत हे उपाय, पितृदोषातून होईल सुटका
नियमितपणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि देवता प्रसन्न होतात. तसेच पितृ पक्षात दिवा लावणे देखील शुभ मानले जाते.

मुंबई : हिंदू धर्म आणि सनातन धर्मात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. दिवा हा आपल्या उपासनेचा साक्षी असतो. तथापि, धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळ्या प्रकारे दिवे लावण्याचे सांगितले आहे. उदाहरणार्थ, देवी लक्ष्मीला तुपाचा दिवा आवडतो, तर हनुमानजींना चमेलीचा दिवा आणि शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा आवडतो. नियमितपणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि देवता प्रसन्न होतात. तसेच पितृ पक्षात दिवा लावणे देखील शुभ मानले जाते. यंदा पितृपक्ष (Pitrupaksha 2023) 28 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत 15 दिवस चालणाऱ्या पितृ पक्षामध्ये योग्य दिशेने दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतील.
घरातील या ठिकाणी दिवा लावणे खूप शुभ असते
- पितृ पक्षात दक्षिण दिशेला दिवा लावा: तसे, अनेक घरांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी संध्यावंदनाच्या वेळी दिवे नक्कीच लावले जातात. परंतु पितृपक्षात दररोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. ही दिशा पूर्वजांची मानली जाते. हा उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
- ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा: घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर आणि पूर्वेतील दिशा) रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देईल. यामुळे घरात कधीही आर्थिक समस्या उद्भवत नाहीत. असे रोज केल्याने पितर खूप प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
- पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे : पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडावर देवी-देवतांसोबत पूर्वजांचाही वास असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्यास त्याचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय पितृदोषापासूनही तुमची सुटका होईल.
- स्वयंपाकघरात पाण्याजवळ दिवा लावा : ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने पितर प्रसन्न होतात. पितृपक्षात नियमित संध्याकाळी स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. यासोबतच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघीही प्रसन्न होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
